आकाशाशी जडले नाते.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू :दि. 14 नूतन विद्यालय सेलू येथे भूगोल दिनाच्या पूर्वसंध्येला पौष पौर्णिमेच्या दिवशी दिनांक 13 रोजी आकाशाशी जडले नाते हा अवकाश दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाबराव डख, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्था पन समितीचे अध्यक्ष सितारामजी मंत्री, नूतन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी. के देशपांडे गुरुजी, नूतन शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य पावडे नाना यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. 
या कार्यक्रमा अंतर्गत सेलू तालुक्यातील उपस्थितांना चंद्र, गुरु, शनी हे ग्रह व उपग्रह टेलिस्कोपच्या माध्यमातून दाखव ण्यात आले. आपल्या पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राला इतक्या जवळून पाहताना त्यावरील विविध डाग आणि प्रकाशित भाग पाहून विद्यार्थी भारावून गेले.
सेलू तालुक्यातील जेष्ठ नागरिक, पत्रकार, हौशी खगोल अभ्यासक विविध शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने नूतन विद्यालयातील प्रार्थना मैदानावर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी नूतन विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तर शाळेचे मुख्याध्यापक एस.व्ही. पाटील,उपमुख्याध्यापक के के देशपांडे पर्यवेक्षक रोहिदास मोगल, सामाजिक शास्त्र विभागप्रमुख सुधीर जोशी सरांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.