महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी

प्रतिनिधी:रियाज जैनापुरे
२६ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारत देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो यांचं दिवशी महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेले  भारतीय संविधान लागू करण्यात आले आणि याच दिवशी खऱ्या अर्थाने भारतीय लोकांना त्यांचे मूलभूत हक्क अधिकार स्वातंत्र्य मिळाले पण याच दिवशी अमरितसर पंजाब मध्ये एका व्यक्तिकडून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची आणि भारतीय संविधान असलेल्या शिल्पाची तोडफोड करण्यात आली तसेच भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत असताना‌ पायातील बूट न काढता त्यांचे पुजन केले या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना या निवेदनाद्वारे संबंधित व्यक्तिवर कठोरातील कठोर शासन व्हावे या मागणीचे निवेदन आंबेडकरवादी सेनेकडून जिल्हाअधिकारी कार्यालयात देण्यात आले.
तसेच कोल्हापूर महापालिकेच्या संबंधित प्रशासकीय अधिकारी वर गुन्हा दाखल करण्यात यावे यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांना जाहिर पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले.त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुहास हुपरीकर,प्रदेश प्रवक्ते शाहिद शेख (सर), पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश महापूरे,जिल्हा महासचिव सुहेल शेख,जिल्हा सचिव शाहिन बारगीर,इक्बाल शेख आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.