जन्मदात्या आईने चार मुलांना कालव्यात टाकून आत्महत्येचा प्रयत्न चार मुलांचा मृत्यू : आईला वाचवण्यात यश.

बोरगांव/प्रतिनिधी.
कौटुंबिक वादातून जन्मदात्या आईने चार मुलांना विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी जलाशयाच्या डाव्या मुख्य कालव्या फेकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चारीही मुलांचा मृत्यू झाला तर आत्महत्या करणाऱ्या आईला मच्छीमारांनी वाचवले. घटना विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी जलाशयाच्या डाव्या कालव्यावरील बेनाळ पुलावर घडली. आत्महत्येचा प्रयत्न करणारी  माता व मुले कोलार तालुक्यातील तिलगी खेड्यातील रहिवासी आहेत.याप्रकरणी विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी पोलीस स्थानकात  नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.  तनु निंगराज बजंत्री(वय 5), रक्षा निंगराज बजंत्री(वय 3) हुसेन निगराज बजंत्री व हसन निंगराज बजंत्री(वय 13 महिने) आवळीजवळी मुले यांचा मृत्यू झाला आहे. 
                  याबाबत माहिती अशी की, रविवारी मृत बालकाचे वडील निंगराज व त्यांच्या भावामध्ये रात्री वडलार्जित संपत्तीसाठी भांडण झाले. 
मृत बालकाचे वडील निंगराज यांनी पत्नी भाग्याची समजूत काढून आपण बेंगलोर शहरा ठिकाणी जाऊन काबाडकष्ट मोल मजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवे असे सांगितले होते. 
सकाळी मकर संक्रांतीच्या भोगीच्या दिवशी देव दर्शनाला जाण्याची उत्तर कर्नाटक पद्धत असल्याने पती पत्नी व चार मुले घेऊन सोमवारी सकाळी निघाले. गाडीतील पेट्रोल संपल्याने निंगराजु याने पत्नी व मुलांना कालव्याच्या पुला जवळ सोडून पेट्रोल आणण्यासाठी पेट्रोल पंपाकडे जात होते. अंतरावर गेल्यावर कालव्यात कोणीतरी उडी मारल्याचा त्याला आवज झाल्याने परत येऊ पर्यंत पत्नीने चार मुले कालव्यात फेकून देऊन आपण आत्महत्या करत असल्याचे दिसले. स्थानिक मच्छीमारांना बोलावून तिला वाचवण्यात आले. चार मुले निंगराजुच्या डोळ्या समोरच मृत्यू झाल्याने हंबरडा फोडून जीवाचा आतंक करून घेतला. सदर घटनेची पोलिसतांना माहिती मिळताच निडगुदी पोलीस स्थानकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. कालव्यात बुडून जलसमाधी मिळालेल्या दोन मुलांचे मृतदेह हाती लागले. दोन मुलांचा शोध सुरू ठेवण्यात आला आहे. सायंकाळी उशिरा झाल्याने सदर शोध मोहीम थांबवण्यात आले आहे.
घटनेची नोंद विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी  पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू ठेवला आहे.
घटनास्थळी  कुटुंब व नागरिकांची एकच गर्दी 
कौटुंबिक कारणातून जन्मदात्या आईनेच टोकाची भूमिका घेऊन चार मुलांना जलसमाधी दिल्याने कुटुंबीय व नागरिकांतून एकच हळहळ व्यक्त  करण्यात येत होती. कोवळ्या मुलांचे मृतदेह पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिक व कुटुंबांचे डोळे पाण्याने भरून आले. बालकाच्या आजोबांनी तर हंबरडा फोडल्याने स्थळी उपस्थित नागरिकांचे हृदय हेलावून जात होते.या घटनेने परिसरात हळहळ केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.