खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित,खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पुजनाने व दिपप्रज्वलनाने झाली. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांचे हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.
यानंतर इयत्ता 7 वी ब ची विद्यार्थीनी कु.अलिशा शब्बीर अत्तार हिने आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये तिने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली.तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती तसेच स्त्रियांच्या शिक्षणा साठी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याची माहिती आपल्या मनोगतातुन सांगितली.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.हेमगिरे एस.के.यांनी केले.तर आभार श्री.समाजे सी.बी. यांनी मानले.
टिप्पण्या