पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा विविध संस्थेच्या वतीने सन्मान.
शिवाजी शिंदे
दर्पण दिन मोठया उत्सवात साजरा.
सेलू : दि. 06 सोमवार रोजी सेलू येथे पत्रकारितेचा वसा चालवत विविध घटकातील लोंकांच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या शहरातील व तालुक्यातील पत्रकारांचा दर्पण दिनानिमित्त शहरातील विविध संस्था यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून दर्पण दिनानिमित्त पत्रकाराच्या सन्मानाची परंपरा यावेळी देखील येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या वतीने जोपसण्यात आली आहे.या सत्कार सोहळ्यासाठी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आढळकर,उपाध्यक्ष चंद्रशेखर मूळावेकर,संचालक तथा माजी नगराध्यक्ष पवन आढळकर,बँकेचे कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांची उपस्थिती होती.यावेळी प्रस्ताविकात रामराव लाडाने यांनी बँकेच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती देत बँकेचा लेखाजोखा सादर केला.पत्रकारांच्या वतीने डॉ.विलास मोरे आणि मोहसीन मामू यांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार मानले. अध्यक्षीय समारोपात हेमंतराव आढळकर यांनी पत्रकारांचे बँकेला असलेले सहकार्य स्पष्ट करून दर्पण दिनांच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.तसेंच सर्व पत्रकारांना सहकार्य करण्याचे स्पष्ट केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष घुले यांनी केले.
सेलू पोलीस स्टेशनच्या वतीने देखील दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे,अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल,व्हाईस ऑफ मिडीयाचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी प्रस्ताविकात कार्यक्रमाचा उद्धीष्ट स्पष्ट करण्याचा हेतू सादर केला.यावेळी पत्रकारांच्या वतीने राम सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो व जनमत बदलण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत आहे.सध्या स्पर्धेचे युग आहे लवकरात लवकर आपली बातमी अगोदर कशी येईल यासाठी स्पर्धा आहे.परंतु पत्रकाराणी बातमी देताना सत्यता पडताळूनच बातमी देणे गरजेचे आहे.असे मत पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी व्यक्त केले. पत्रकार आणि पोलीस यांचा समन्वय असणे देखील गरजेचे आहे असे पण ते म्हणाले.
टिप्पण्या