मुलांना कर्तव्याचा विसर पडल्याने ज्येष्ठ नागरिकांना घ्यावा लागतोय वृद्धाश्रमांचा आधार : प्रा. अभिजीत पाटील.

आई वडिलांनी मुलांना लहानाचे मोठे केले, वृद्धावस्थेत त्यांचा सांभाळ करणे हे मुलांचे आद्यकर्तव्य आहे पण त्याचा मुलांना विसर पडत चालल्याने ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमांचा आधार घ्यावा लागत आहे असे प्रतिपादन  प्रा. अभिजीत पाटील यांनी केले .      .                   देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, इचलकरंजी मधील समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी इचलकरंजी येथील समाधान वृद्धाश्रमास भेट दिली यावेळी ते बोलत होते.
           क्षेत्र कार्य पद्धतीतील अभ्यासाचा एक भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्यांच्याशी संवाद साधण्याच्या हेतूने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. 
          यावेळी विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला तसेच प्रश्नावलीच्या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रा.अभिजित पाटील यांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांना फळांचे वाटप करण्यात आले.
            सदर कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ विरुपाक्ष खानाज यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा अभिजीत पाटील यांनी केले. यावेळी प्रा. पुजा कोलकार यांच्यासह समाजशास्त्राचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.