श्री चक्रराज यंत्र पूजन सोहळासाठी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या कडून मोफत वाहन व्यवस्था.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलू : श्री चक्रराज यंत्र पूजन सोहळ्यासाठी श्री क्षेत्र वेरूळ येथे जाण्यासाठी सेलू शहराचे लाडके आणि लोकप्रिय माजी नगराध्यक्ष विनोद  बोराडे साहेब यांच्या तर्फे सेलू येथील सर्व स्वामी समर्थ सेवेकरी  वेरूळ या ठिकाणी जाण्यासाठी व येण्या साठी बारा क्रुझर वाहनाची व्यवस्था केली केली.  त्याबद्दल श्री स्वामी समर्थ केंद्र महेश नगर व मारुती नगर सेलू यांच्या वतीने व तसेच समस्त सर्व सेविकाऱ्यांच्या वतीने विनोद बोराडे साहेबांचे शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.रात्री तीन वाजता सर्व स्वामी समर्थ च्या सेवेकरी यांना वाहनाची स्वतंत्र व्यवस्था करून त्याची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः जातीने रात्री उपस्थित राहून वाहन चालकांना  भक्तांना व्यवस्थित घेऊन जाण्याच्या सूचना व मार्गदर्शन केले. भर रात्री समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना उराशी बाळगत  विनोद बोराडे हे नेहमीच अग्रेसर असतात. सेलू शहराच्या विकासासाठी अत्यंत तळमळीने कार्य करणारा एक कार्यकर्ता सामान्य जनतेच्या सुख दुःखात सदैव पाठीशी राहून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. त्यांनी आज पण आपल्या गावातील भाविक भक्तांची गैरसोय दूर करण्यासाठी वाहनाची सोय केल्या बद्दल भाविकांनी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त केले. यापुढे आपले सहकार्य सदैव लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना करीत भाविकांनी धन्यवाद व्यक्त केले. कार्यक्रमा साठी प्रमुख नगराध्यक्ष विनोद बोराडे साहेब हे उपस्थित होते.श्री स्वामी समर्थ केंद्र महेश नगर च्या वतीने साहेबांचा सत्कार केंद्राचे ज्येष्ठ सेवेकरी रामकिशन बाबर यांचा यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच राजेंद्र झोडगावकर यांचा सत्कार सुनील गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी महेश नगर केंद्राचे केंद्र प्रतिनिधी संजय आप्पा गव्हाडे निवृत्ती पोदाडे तसेच पुरुष  सेवेकरी व महिला सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.