खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी.
शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमा पुजनाने व दिपप्रज्वलनाने झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. यासीन मुजावर सर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापुजन संपन्न झाले.
यानंतर विद्यालयातील इयत्ता 5वी तील विद्यार्थीनी कु.अंजली बिरंगे हिने आपल्या मनोगतातुन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची माहीती सांगितली.तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेल्या देशकार्या विषयी माहिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक- शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. समाजे सी.बी.यांनी केले.तर आभार सौ.मगदुम एस.जी.यांनी मानले.
टिप्पण्या