यड्राव येथे अपघातात शाळकरी मुलगा गंभीर जखमी .
यड्राव (प्रतिनिधी ) ः यड्राव मराठी शाळा जवळ शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांचा अपघात होऊन गंभीर दुखापत झाली आहे या अपघातात त्याचा उजव्या पाय गुडघ्याखाली फॅक्चर झाला आहे . सुजल गणेश साळुंखे (वय 6, रा. हर्षवर्धन नगर) असे विद्यार्थ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुजल हा शाळा सुटल्यानंतर घरी जात होता एसटी स्टँड चौकातून कोंडिग्रे कडे जाणाऱ्या मार्गावर शरद सोसायटीजवळ एचएफ डीलक्स या मोटरसायकलस्वाराने सुजल ला धडक दिली या अपघातात सुजल गंभीर जखमी झाला असून उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन उजव्या पायाला गुडघ्या खाली पाय फ्रॅक्चर झाला आहे दरम्यान शेजारील नागरिकांनी सूरजला तात्काळ इचलकरंजी येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलिसात झाली नव्हती .
टिप्पण्या