बेडकिहाळ चाँदशिरदवाड मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध जागीच ठार.
बेडकिहाळ दूधगंगा पुल चाँद शिरदवाड या मार्गावर बाबर (टाकळे) यांच्या शेती शेजारील प्रमुख मार्गावर रविवार तारीख 12 रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान , बेडकिहाळ सर्कल हून चाँद शिरदवाड कडे चालत जात असलेले चाँदशीरदवाड येथील रहिवाशी असलेले प्रकाश महालिंग स्वामी, वय 52 यांना अज्ञात वाहन धडक दिल्याने रस्त्यावर पडून जागीच ठार झाले.
घटनास्थळी रक्त पडल्याचे दिसत होते. रस्त्यावर पडलेली व्यक्ती चाँद शीरदवाड येथील प्रकाश स्वामी आहेत असे समजताच चाँद शिरदवाड येथील ग्राम पंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली.
घटना स्थळी सदलगा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व सहाय्यक पोलीस यांच्या सह भेट देऊन पंचनामा केला, व प्रेताची उत्तरीय तपासणी सदलगा येथे करून शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
मयत प्रकाश यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या प्रकाश स्वामी यांचे अचानक अपघाती निधन झाल्याने गावांतून हळ हळ व्यक्त होत आहे.
टिप्पण्या