अबंप . ता . हातकणंगले येथील २२ व्या छ . शंभूराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलना साठी मान्यवरांच्या निवडी . १६ फ्रेबुवारी २५ रोजी होणार संमेलन .

हातकणंगले प्रतिनिधी

रविवार दिनांक १६ फ्रेबुवारी २५ रोजी सकाळी ८  वाजता  अ अबंप ता हातकणंगले जि कोल्हापूर येथील विवेक वाचनालय अबंप आणि  कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित  राज्यस्तरीय २२ वे छ. शंभूराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .संमेलन अध्यक्ष म्हणून  साहित्यिक  मा तानाजी आसबे सर वाळवे खुर्द हे भूषवणार आहेत तर उद्घाटक मा प्रा सागर बगाडे सर असून प्रमुख पाहुणे कांदबरीकार लेखक दि .बा .पाटील कामेरी व प्रमुख अतिथी कु आशू .मेश्राम सिने अभिनेत्री  गडचिरोली या उपस्थित राहणार आहेत . सकाळी ८.३० ग्रंथ दिंडी असून त्यांचे उद्घाटन सौ दिप्ती विभासराव माने सरपंच अबंप यांचे हस्ते होणार असून ग्रंथदिंडी पुजन मा बी टी पाटील विवेक वाचनालय अध्यक यांचे हस्ते होणार असून मा काकासो पाटील मा डॉ बी के पाटील 'मा विजयसिंह माने मा राजवर्धन पाटील बी के माने सर मा राजेंद्र माने सर यांची उपस्थिती अरुणार  . स्वागताध्यक्ष मा महादेव बापू डोंगरे  तर प्रास्ताविक मा तुकाराम  भाऊसो निलजे करणार आहेत . उद्घाटन सत्रात पत्रकार कवि सरकार यांच्या स्वलिखित काव्यसंग्रह व लंपादित संमेलन विशेषांक तसेच  माजी सैनिक लेखक कवि अशोक मोहिते बार्शी यांच्या काव्य .जागर  काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध बॉलिहूड अभिनेत्री चित्रा दिक्षित दाक्षिण मुंबई यांच्या हस्ते करणेत येणार आहे . दुपारी सौ स्वाती जंगम यांचे व्याख्यान आणि   कांदबरीकार डॉ श्रीकांत पाटील घुणकी ' यांची मुलाखात होणार आहे मनोहर भोसले सै . टाकळी सौ आरती लाटणे इचलकरंजी कु प्रतिभा बामणे परिते हे घेणार आहेत . तिसऱ्या सत्रात  कविसंमेलन मा प्रा डॉ सुरेश कुराडे साहित्यिक व विचारवंत गडहिंग्लज यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे .अशोक मोहिते बार्शी  दिपक पवार सर रुकडी . काशिनाथ आव्हाड अहिल्यानगर ' डॉ कवी मधूकर  हुजरे धाराशिव  कवि सागर साठे संगमनेर यांची उपस्थिती असणार आहे .
तसेच त्याचप्रमाणे कविसंमेलन साठी  कोल्हापूर ' सोलापूर ' अहिल्यानगर ' बेळगाव सातारा गारगोटी  गडहिंग्लज धाराशिव ,छ .संभाजी नगर ,पुणे ' सातारा आदी जिल्ह्यातील कवि कवियत्री सहभागी होणार आहेत . साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी विवेक वाचनालय सर्व संचालक मंडळ परिश्रम घेत आहेत . असे कवि सरकार इंगळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.