बोरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे व साबीर नदाफ यांच्या वतीने बोरगाव परिसरातील पत्रकारांचा जाहीर सत्कार.

निपाणी तालुक्यातील बोरगाव या शहरी असणारे तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी बोरगाव परिसरात सामाजिक कार्यात एक वेगळाच ठसा उमटवला आहे त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत गोरगरिबांसाठी अन्नधान्याची मदत मजुरांसाठी ब्लॅंकेटचे वाटप वाहनधारकासाठी कमी किमतीमध्ये पेट्रोलचे वाटप विद्यार्थ्यांसाठी विमान प्रवास अशा अनेक प्रकारे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आर्थिक भरतीचा हात पुढे करणारा बोरगाव परिसरातील एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजातून ओळखला जात आहे.
पत्रकार दिनाचे औचित साधून आज बोरगाव - इचलकरंजी या मार्गावरील हॉटेल ग्रँड जनता येथे बोरगाव परिसरातील पत्रकार अण्णासाहेब कदम,उत्तम माने, शिवाजी भोरे, अजित कांबळे, अशोक दुर्गमर्गे, सुयोग किल्लेदार, प्रशांत कांबळे इत्यादी पत्रकारांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन उपस्थित मान्यवर तुषार कांबळे, अण्णासाहेब कदम, मौला मुजावर, आजुबा पांगिरे, साबीर नदाफ. यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
या पत्रकार दिनाचे औचित्य  साधून घेण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सदलगा शहरातील आर के फाऊंडेशनचे संस्थापक व जेष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम हे होते तर प्रमुख पाहुणे हॉटेल ग्रँड जनताचे मालक साबीर नदाफ हे होते .
आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांनी *पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो, समाजातील चांगल्या व वाईट दोन्ही बाजू प्रकर्षाने मांडून त्यातून उणिवा दूर करून समाज सुधारणा घडवून आणण्याचे काम आपल्या लेखणीतून पत्रकार सदैव करीत असतो आणि ही सुद्धा एक सेवाभावी समाजसेवाच असते* असे त्यांनी आवर्जून सांगितले.
या पत्रकार सत्कार समारंभ प्रसंगी युवा सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे साबीर नदाफ अजूबा पांगिरे प्रशांत कांबळे अजित कांबळे सुयोग किल्लेदार उत्तम माने, शिवाजी भोरे, अशोक दुर्गमर्गे, मौला मुजावर, शिवाजी साळुंखे,एम डी बाबू,निलेश कांबळे, गुरु कांबळे,एकनाथ पाटील,अजय कांबळे, संजय पाटील व तुषार कांबळे मित्रमंडळी यांच्यासह अनेक नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.