छत्रपती ग्रुप यांच्यावतीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना भटक्या कुत्र्याबाबत निवेदन
छत्रपती ग्रुप हुपरी शहर यांच्या वतीने आज दि. 27 जानेवारी 2025 रोजी
हुपरी शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती समस्या आणि त्यावर उपाययोजना करण्याबाबत प्रशासकीय अधिकारी हुपरी नगरपरिषद हुपरी यांना निवेदन देण्यात आले.
हुपरी शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे
विशेषतः मुले, वृद्ध आणि पाळीव प्राणी यांना अधिक धोका आहे.
आणि आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातून घेतलेल्या माहिती नुसार मागील काही महिन्यात गावातील भटक्या कुत्र्याने चावा घेतलेले पेशंट खूप वाढले आहेत.त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात
त्याची सर्व गांभीर्य आम्ही निवेदनाच्या द्वारे नगरपरिषदेला दिली आहे.
*[गावातील आरोग्याकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत असुन भटकी कुत्री गाडीच्या आडवी येऊन अपघात घडणे लहान मुले खेळत असताना त्याचा चावा घेणे असले काहीसे प्रकार होत असुन नगरपरिषद यानी तात्काळ उपाययोजना करावी.]*
यावेळी उपस्थित
छत्रपती ग्रुपचे सौरभ खोत,शिरोळ तालुका प्रमुख संदीप पवार,
शुभम चोपडे,उमाजी लाड,संग्राम जाधव, कुणाल खोत,गावातील प्रतिष्ठित नागरिक साताप गायकवाड (सरकार), प्रदीप चव्हाण,सोमनाथ नंदाळे,सूर्यकांत रावण, जितेंद्र पाटील याच बरोबर छत्रपती ग्रुप चे सहकारी पदाधिकारी उपस्थित होते
टिप्पण्या