मा.निलेश बन्ने विचारमंच वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम
वार्ताहर - रियाज जैनापुरे वडणगे येथे कन्या विद्यामंदिर आणि कुमार विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मा.निलेश बन्ने विचारमंच वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा सन्मानीय सत्कार करण्यात आला.यामध्ये कुस्ती, निबंध स्पर्धा, लाठीकाठी,कराटे, शिष्यवृत्ती अशा विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना प्रमाणपत्र व पुष्प देऊन सन्मानिय सत्कार करण्यात आला.तसेच वर्षभर शासनाच्या वतीने देण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहार माध्यमातून सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जेवू घालणारे शालेय पोषण आहार मदतनीस महिलांचा निलेश बन्ने विचारमंच वतीने शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानिय सत्कार करण्यात आला.यावेळी कन्या विद्यामंदिर आणि कुमार विद्यामंदिर मुख्याध्यापक चोपडे सर,शिक्षिका योगिता गायकवाड, पोतदार मॅडम,काटकर मॅडम, आणि सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.विचारमंच अध्यक्ष निलेश बन्ने,प्रथमेश तेलवेकर,सलीम मोमीन, अरविंद कचरे याबरोबरच सर्व पालक वर्ग उपस्थित होते.
टिप्पण्या