26 जानेवारी 2025 रोजी बोरगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन. बोरगांव नगरीत एकाच दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन हे नवलच.
बोरगाव येथे 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त विविध संघटनेमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये बोरगाव येथील एल बी बॉयिज यांच्या वतीने भव्य अन दिव्य हाप स्पीच क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्रथम क्रमांक बक्षीस 21001, नगर सेवक शरद जंगठे यांच्या कडून, द्वितीय बक्षीस 15001, श्री दादासाहेब भादोले यांच्याकडून, तृतीय बक्षीस 10001 श्री पिंटू दुर्गमरगे, शिवाय वैयक्तिक बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही बोरगाव येथील आर के नगर मध्ये 26 जानेवारी पासून सुरू होत आहे.
बोरगावचे ग्रामदैवत श्री हजरत पीर बावां ढंग वली दर्ग्याच्या भव्य पटांगणामध्ये 26 जानेवारी 2025 रोजी रात्री आठ वाजता हिंदू मुस्लिम करबल कमिटी व जीपी स्पोर्ट्स यांच्या वतीने भव्य करबल दंगली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, यामधील प्रथम क्रमांक बक्षीस 11001, द्वितीय 9001, तृतीय 7001,चतुर्थी 5001 व पाचवं बक्षीस 3001 अशी बक्षिसे ठेवण्यात आलेले आहेत, व बाबासाहेब भिकू यांच्याकडून सर्व बक्षीस विजेत्यांना स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहेत.
दक्षिण भारतात जैन समाजातील अग्रगण्य असलेली संघटना दक्षिण भारत जैन सभा संचलित वीर सेवा दल या संघटनेला 46 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बोरगाव येथील जैन गुंफा निशिधी या ठिकाणी या वर्धापन दिनाचे व संघातील मान्यवरांचा सन्मान सोहळा दक्षिण भारत जैन सभा च्या वतीने व निपाणी भागचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात होणार आहे .
बोरगाव येथील इंजिनिअर क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व राजेंद्र पाटील यांच्या आर बी पाटील असोसिएशनच्या चाळीसावा वर्धापन दिन बोरगाव येथील बुधवार बाजार पेठ कार्यालयाच्या शाखेत संपन्न होणार आहे या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे,
सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी आशा आयुर्वेदिक क्लिनिक advanse अकुप्रेशर अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने बोरगाव ग्राम दैवत हजरत पीर बावा ढंग वली दर्गा च्या पटांगणात सर्व सामान्यांच्या साठी भव्य आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये दात दुखी, अंगदुखी,गुडघे,मूळव्याध अशा विविध विकारावर तपासणी करण्यात येणार आहेत .
रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या बोरगाव येथील विविध कार्यक्रमात सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे, असे आवाहन विविध संघटनेचे कार्यकर्ते यांच्या कडून करण्यात आले आहे,सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
टिप्पण्या