हुपरीत प्रथमच २ फेब्रुवारीला"यादोंकी बारात" संगीत रजनी महंमद रफी यांच्या गाण्यांची सुरेल मैफिल

हुपरी:
 संगीतप्रेमी संघटना हुपरीच्या वतीने ज्येष्ठ गायक स्व. महंमद रफी यांच्या गाण्यांच्या सुरेल मैफिलीचे आयोजन केले असून महंमद रफी फेम गायक इब्राहिम कोझी हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे. हुपरी शहरांमध्ये प्रथमच होत असलेल्या स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या सुरेल गीतांची मैफल 
श्री अंबाबाई मंदिर खुले नाट्यगृह प्रांगण येथे रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी रात्रौ ९ वा. या कार्यक्रमाचे आयोजन केले असून 
जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे संगीतप्रेमी संघटना हुपरीचे अध्यक्ष उमेश दैने यांनी सांगितले आहे. 
कोल्हापूरच्या सुतार बंधू यांच्या प्रसिद्ध "झंकार ऑर्केस्ट्रा" यांचेकडे या कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले आहे. 
या कार्यक्रमात इब्राहिम कोझी यांचेबरोबरच पुणे, मुंबई येथील नामवंत गायक गायिका कलाकार  आपले कलाकौशल्य सादर करणार आहेत. 
या कार्यक्रमासाठी प्रवेशिकांसाठी खालीलप्रमाणे संयोजक उमेश दैने, प्रकाश वाळवेकर, बाळासोा ऐनापूरे, जावेद कलावंत, प्रकाश ककडे, धैर्यशिल पाटील, उमेश पडवळ, जमिर कलावंत, राजेंद्र पाटील (RJP), धनंजय खाडे, प्रसाद वाशिकर, संजय कोळेकर, शितल माळी यांचेशी संपर्क साधावा.असे आवाहन संयोजन समिती तर्फ केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.