वाढदिवस साजरा न करता त्या पैशातून उपजिल्हा रुग्णाल्यास स्टेशनरी साहित्य भेट.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : सेलू येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवा निवृत्त कर्मचारी प्रदीप किशनराव शिंदे यांनी आपला वाढदिवस   साजरा न करता त्याला फाटा देत त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा चांगल्या कार्यासाठी विनियोग व्हावा म्हणून सेलू येथील उपजिल्हा रुग्णाल्यास अवश्यक असणारी स्टेशनरी खरेदी करून रुग्णाल्याचे अधीक्षक डॉ. जनार्धन गोळेगावकर,वैधकीय अधिकारी डॉ.कोंडावार, पत्रकार डॉ.शिवाजी शिंदे,शुक्राचार्य शिंदे, परिसेविका एम.ए.घडमोडे,कारकून दीपक बहोत,कारकून भारत गायकवाड,कारकून बाळासाहेब रोडे,सहाय्य्क अधिकारी यु.एन.काटकर,शिपाई पवन फरकांडे आदी जनाच्या उपस्थित स्टेशनरी देऊन आपला वाढदिवस साजरा केला.यावेळी प्रस्ताविक डॉ.शिवाजी शिंदे यांनी केले.तर स्टेशनरी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या या अनोख्या उपक्रमास डॉ.गोळेगावकर यांनी शुभेच्छा देत त्यांचे आभार व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.