अन्यायाविरुद्ध न्यायाचा रथ चालवा- ह.भ. प.प्रसाद महाराज काष्टे

शिवाजी शिंदे
सेलू तालूका प्रतिनिधी 
सेलू : दि. 21 जाने. समाजात कितीही वाईट प्रवृत्तीची लोक असली तरीही आपण आपला चांगुलपणा सोडू नये अन्याया विरुद्ध आपण सतत लढत राहिलं पाहिजे आणि आपल्या न्याया चा रथ चालवला पाहि जे. यासाठी चांगली माणसं जोडणं अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यां नी सभा धीटपणा अंगीकारावा जो प्रयत्नांनी येतो.
असे प्रतिपादन ह. भ. प .प्रसाद महाराज काष्टे यांनी केले काजळी रोहिना येथे आयोजित नूतन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना समारोप समारंभात मंगळवार (दिनांक 21) रोजी केले. कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया हे होते. नूतन महाविद्या लयाचे काजळी रोहिना येथे ‘युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी’ हा विषय असलेले शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरा त प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ह भ प प्रसाद महाराज काष्टे पुढे म्हणाले की," युवकांनी सतत आपल्या ध्येयाचा ध्यास धरावा आणि ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न करावेत सातत्य आणि मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे. परीक्षेत यश मिळवण्या सोबतच एक चांगला व्यक्ती सुद्धा व्हावे असे ते म्हणाले.यावेळी व्यास पीठावर नूतन महा विद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, काजळी रोहिण्याचे सरपंच भारत इंद्रोके उपसरपंच भारत काष्टे, मुंजाभाऊ काष्टे, सचिन इंद्रोके, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सुरेश उगले,प्रा.विशाल पाटील, प्रा.डॉ. कीर्ती निरालवाड, प्रा.डॉ. शिवराज घुलेश्वर, प्रा. महेश कुलकर्णी, प्रा. डॉ. आर जे नाथांनी, प्रा. अर्चना ठोंबरे,प्रा. शुभांगी नायकल आदी उपस्थित होते.या समारोप प्रसंगी नूतन महाविद्यालयातील प्रा. डॉ. राजाराम झोडगे, प्रा. डॉ. राजाराम खाडप ,प्रा. हेमचंद्र हडसनकर ,प्रा. श्याम गरुड, प्रा. प्रसाद पांडे, प्रा. विलास खरात, यांची विशेष उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा गिराम तर आभार नंदिनी शिंदे हिने मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता रिठे ,रंगनाथ सोळंके ,
पंकज मगर ,मनोज सोळंके, पिनू पांचाळ यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.