हुपरी येथील जवाहर कारखान्याचा ऊस वाहतूकचा पहिला बळी मोठा अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू.

हुपरी प्रतिनिधी - हुपरी जवाहर साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाला असून यावेळच्या हंगामातील पहिला अपघाताचा बळी हुपरी येथील गेला असून
कागल एमआयडीसी रोडला असणाऱ्या व्यंकटेश सहकारी सूतगिरणीच्या जवळुन
लग्न समारंभ आवरून [MH-09-BC-2169] ॲक्सिस गावी येत असताना उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने
व मागून आलेल्या हौदा टेम्पो *[MH-09-CU-2854]* याचे दोन्ही चाके अंगावरून गेल्याने हुपरीचे सुनील पुरंदर गाट (हुपरी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष)
यांचा जागीच मृत्यू झाला
अपघात ग्रस्त सुनील यांना हुपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्या ठिकाणी पोस्टमार्टम विभाग बंद असल्याने त्यांना इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले.
[हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था *ना घर का ना घाटका* अशी केली असून हुपरी येथील नागरिकांची अथवा पाचगावातील नागरिकांची पोस्टमार्टमसाठी इंचलकरंजी किंवा कोल्हापूरला जावं लागत असून इतकं मोठं रुग्णालय असून हुपरी सारख्या नगरपालिकेच्या गावांमध्ये पोस्टमार्टम विभाग चालू नसल्याने हुपरीतील नागरिकांच्यातून असंतोष निर्माण होत असून *सरकारी रुग्णालय रामभरोसे*
का ठेवले आहे याचे उत्तर लोकप्रतिनिधी का देत नाहीत यासंदर्भात हुपरीतील नागरिक चर्चा करताना दिसून आले]
अधिक तपास व पंचनामा हुपरी पोलीस करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.