वडजी येथे १००% मतदान १००% टी.बी. मुक्त गाव"

प्रतिनिधी - सारंग महाजन
          वडजी येथे १००%  मतदान आव्हान करतांना जनतेच्या आरोग्यसाठी वडजी येथील सरपंच शत्रुघ्न मधुकर बाजड व आरोग्य विभागाच्या पुढाकाराने बी. सी. जी. लस  टी. बी. ची बिमारी होऊ नये व प्रतीबंध करण्यासाठी गावकरी यांना मतदान झाल्या नंतर इच्छुक नागरिकांनी अंगणवाडी मध्ये टी.बी. लसीकरणासाठी उत्पुर्द प्रतीसाद मिळाला. सरपंच यांनी 'एकदा लस घ्या आणि जिवनभर टी.बी. मुक्त रहा' असा नारा लावल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील पहीले बी. सी. जी. चे टार्गेट पुर्ण करणारे गाव ठरले कारण या आधीही २ वेळेस युद्धपातळीवर लसीकरण करून घेण्यात आले आहे आरोग्य विभागाच्या कामाला वडजी गावातील जागरूक नागरिकही खुप सहकार्य करीत आहेत. २०२६ पर्यंत वडजी हे गाव देशातील पहीले टी. बी. मुक्त गाव असेल असा विश्वास ग्रा.प. सदस्य, कर्मचारी व गावकरी यांच्या वतीने सरपंचांनी व्यक्त केला. आधार कार्ड कॅम्प व लसीकरण, तसेच मतदानाच्या दिवशी गावातील उपस्थित व बाहेर गाव वरून आलेले सर्वच उपलब्ध असतात ज्याने लसीकरणाचा वेग वाढतो, वेग वेगळ्या शक्कल लढवून तसेच गावकरी यांना लसीकरणाचे मोल पटवून देऊन गावकरी यांचा लसीकरणा विषयी उत्साह वाढला जात आहे.
                WHO च्या रिपोर्ट नुसार टी. बी. जगातील सर्वात घातक बिमारी ठरली असुन ज्यामुळे कोरोना नंतर सर्वात ज्यास्त मृत्यू होत आहेत. "ग्लोबल टुबरकुलोसीस रिपोर्ट २०२४" नुसार २०२३ मध्ये ८२ लाख लोकांना संक्रमण झाले होते. १९९५ पासुन निरीक्षक सुरू झाले होते आणि तेव्हा पासून २०२२ मध्ये ७५ लाख पेक्षा ज्यास्त नविन केस लक्षात आले होते. २०२३ मध्ये १२.५ लाख लोकांची मृत्यू झाली होती. २०२३ मध्ये कोरोना १९ मुळे ३.२ लाख मृत्यू पेक्षा खुपचं ज्यास्त आहे. २०२३ मध्ये एच. आय. व्ही. (एड्स) ने ६.८ लाख मृत्यू झाल्या होत्या त्या तुलनेत टी. बी. ने होणाऱ्या मृत्यू दोन पट  आहेत. म्हणून लसीकरण करणे सर्वांनसाठी आवश्यक आहे हेच महत्व वडजी येथील (पि. एच.डी. वाला) सरपंच म्हणून प्रख्यात असलेले जाणुन आहेत. स्वतः वैज्ञानिक क्षेत्रात काम करत असल्याने सर्वांना आग्रह पुर्ण विनंती करून लसीकरण करणे गरजेचे समजत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.