खोतवाडीत मतदान प्रक्रिया शांततेत, सायंकाळ पर्यंत 71.84 टक्के मतदान. दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांनीही बजावला मतदानाचा हक्क

हातकणंगले -
 279 विधानसभा मतदार संघांमधील खोतवाडी येथे चुरशीने   71.84 % इतकं मतदान झाले.
सकाळी सात वाजले पासून दुपारी दोन वाजेपर्यंत तुरळक प्रमाणातच मतदार मतदानाचा हक्क बजावताना दिसत होते. दुपार नंतर मात्र हळू हळू मतदान केंद्रावर मतदारांचा ओघ वाढला. आणि मतदान केंद्रावर गर्दीच गर्दी झाली. दुपारी तीन पर्यंत 50 % मतदान झाले होते.
दुपार पर्यंत चारही मतदान केंद्रावर संत गतीने सुरू होते. मात्र दुपारी चार नंतर मतदान केंद्रावर लांबच लांब रांग लावून  उच्चांकी पद्धतीने मतदान करण्याचा प्रयत्न केला. 
      खोतवाडीत केंद्र निहाय झालेले मतदान, पुढीलप्रमाणे केंद्र क्रमांक 24 - एकूण मतदान 1183 पैकी झालेल मतदान 855, 

केंद्र क्रमांक 25 - एकूण मतदान 1075, झालेल मतदान 715, 

केंद्र क्रमांक 26 - एकूण मतदान 950, पैकी झालेल मतदान 679,

केंद्र क्रमांक - 27 -एकूण मतदान 1018, पैकी झालेल मतदान 727, 

एकूण मतदान 4226 पैकी  3036, मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामधे 1483 महिला तर, 1553 पुरूष मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार होवू म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.