उद्या अमित शहांच्या सभेमुळे वाहतुकीमध्ये बदल.मेघना बोर्डीकर साठी जिंतूर विधान सभा मतदारसंघात महायुती चे शक्तीप्रदर्शन होणार.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.  

जिंतूर : दि.12 रोजी   केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची निवडणूकी च्या प्रचारार्थ जिंतूरात बुधवारी (दि.13) दुपारी 2 वाजता परभणी रस्त्यावरील साई मैदानावर मोठी जाहीर सभा आयोजि त करण्यात आली असून या सभेतून जोरदार शक्तीप्रदर्शन व्हावे या दृष्टीने महायुतीच्या उमेदवार तथा आमदार सौ. मेघनासाकोरे-बोर्डीकर
ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह नेतेमंडळी व पदाधिका र्‍यांनी प्रयत्नांची परा काष्टा सुरु केली आहे या विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार तथा विद्यमान आमदार सौ. मेघनासाकोरे-बोर्डीकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री शाह यांची ही सभा होणार असून परभणी रस्त्यावरील साई मैदान हे या सभे करिता स्थळ निश्‍चित करण्यात आले आहे. या सभेच्या निमित्ताने जिंतूर तालुका तसेच सेलू तालुक्यातील शहरासह खेड्या-
पाड्यांमधून मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेत या दृष्टीने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भक्कम असे नियोजन केले आहे. विशेषतः गेल्या दोन दिवसांपासून शहरातील विविध प्रभागांपासून वाडी- तांड्यांपर्यंत पदाधिका री व कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी, छोटेखानी बैठकांमधून भक्कम असे नियोजन केल्या गेले आहे. या ग्रामस्थां नी सभास्थळी वेळेच्या आत पोहोचावे या दृष्टीनेही नियोजन केल्या गेले आहे. विशेषतः जिंतूर तालुक्यावर संख्या बळाकरीता सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले असून सभेच्या निमित्ताने शहरासह या संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मितीही करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना शिंदे गटाचे नेते व कार्यकर्ते सभेच्या यशस्वीते करीता कंबर कसून आहेत. निवडणूकीचे प्रचारयुध्द हळूहळू अंतीम टप्प्यात येवू पोहचले असून त्यामुळे या सभेचे महत्व ओळखून महायुतीने शक्तीप्रदर्शनात कोणत्याही गोष्टीची कमतरता करायची नाही, हे निश्‍चित केले आहे. वाहतूकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून
जिंतूर ते परभणी या महामार्गावर सभेचे स्थळ आहे. तसेच सभास्थळापासून हिंगोली, नांदेड, जालना तसेच छत्रपती संभाजी नगर या ठिकाणांकडे ये-जा करणारी वाहतूक मोठी आहे. सतत वर्दळीच्या असणार्‍या या रस्त्या वर या सभेच्या निमि त्ताने वाहतूकीची कोंडी होवू नये म्हणून जिल्हा पोलिस दलाने अति महत्वाच्या व्यक्तीची सभा ओळखून या महामार्गावर बुधवारी सकाळी 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूकीत बदल केले आहेत. विशेषतः जालन्याकडून जिंतूरकडे किंवा पुढे औंढा नागनाथकडे जाणारी अवजड वाहने ही देवगाव फाटा येथून जिंतूरकडे न येता सेलू, पाथरी, पोखर्णी, सिंगणापूर फाटा, ताडकळस, पूर्णा मार्गे नांदेडकडे वळविण्यात आली आहेत.तर जालना मार्गे जिंतूर कडे किंवा पुढे औंढा नागनाथकडे जाणारी खाजगी वाहने देवगाव फाटा येथून सेलू, मानवत रोड, पेडगाव, परभणीकडून वळविण्यात आली आहेत. जालना मार्गे जिंतूर व हिंगोलीकडे जाणारी अवजड वाहने मंठा, लोणार, लोणी, रिसोड, सेनगाव मार्गे हिंगोलीकडे वळवि ण्यात आली आहेत.  दरम्यान,सभास्थळाच्या चोहोबाजूंनी वाहनांची पार्कींग व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.