खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी.

शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल,खोतवाडी ता.हातकणंगले, जि.कोल्हापुर. येथे थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी झाली.
          या कार्यक्रमाची सुरवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा पुजनाने व दिपप्रज्वलनाने करण्यात आली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर  यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले.
      यानंतर विद्यालयातील सहा.शिक्षक श्री.हेमगिरे एस.के.यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनचरित्रा विषयी माहिती आपल्या मनोगतातुन सांगितली. तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रीयांच्या व मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याची माहिती आपल्या मनोगतातुन सांगितली. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातुन  सांगितली.
               याप्रसंगी सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.हेमगिरे एस.के.यांनी केले तर श्री.समाजे सी.बी.यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.