सेलू डॉक्टर्स सासोसिएशन तर्फे सत्कार.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

डॉ. रोडगे यांची शिक्षण क्षेत्रात संशोधनात्मक कामगिरी - डॉ. ऋतुराज साडेगावकर.

सेलू : दि. 29 रोजी विद्याविहार संकुल येथील कार्यक्रमात मुंबई येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी ईएस एफई कडून स्टार एज्युकेशन अवॉर्ड मिळाल्याबद्दल सेलू डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी सेलू डॉक्टर्सअसोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ऋतुराज साडेगावकर, डॉ.राजेंद्र गात, डॉ.कुंदनानी नंदकुमार, डॉ.अरविंद बोराडे, डॉ.नाईकनवरे अशोक, डॉ.राजेंद्र केवारे, डॉ.बाळासाहेब जाधव, डॉ.गायकवाड उमेश, डॉ.मुळावेकर राजेंद्र, डॉ.बुरेवार आलेस, डॉ. राजेंद्र कारके, डॉ.सोमेश्वर गजमल, डॉ.कुंदन राऊत, डॉ.सचिन काळे डॉ.योगेश बोराडे व डॉ.वसीम खान आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ. साडेगाव कर म्हणाले की, डॉ. रोडगे यांनी ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले तेथे उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असे व्यक्तिमत्व डॉ. संजय रोडगे आहेत. यांच्या कडून बऱ्याच काही गोष्टी आपणास शिकण्यासारखे आहे. ते एवढ्यावरच न थांबता जगामध्ये शिक्षण क्षेत्रात नवनवीन संशोधना त्मक काय चालले आहे त्याचा शोध घेऊन आपल्या शाळेमध्येही त्यापेक्षा ही चांगल्या प्रकारे नवीन वैज्ञानिक संकल्पना राबवण्याचे कार्य डॉ. रोडगे यांच्या हातून होत आहे. सतत त्यांची धडपड सुरूच असते ते निवांत कधीच भेटत नाहीत. परवा जो मुंबईमध्ये ईएसएफईकडून आपल्याला जो स्टार एज्युकेशन पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन करतो. तसेच यापुढे आपण अशाच प्रकारे वैज्ञानिक कामगिरी सुरू ठेवावी अशी आशा करतो आणि पुढील कार्यास शुभेच्छा देतो.या सत्कारप्रसंगी उत्तर देताना डॉ. रोडगे म्हणाले की, सेलू डॉक्टर्स असोसिएशन तर्फे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून जो माझा यथोचित सत्कार केला त्याबद्दल माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून तसेच माझ्या श्रीराम प्रतिष्ठान या संस्थेकडून आपल्या सर्वांचे आभार. पुढे बोलताना म्हणाले की, येत्या 26 डिसेंबरला मला सेलू मध्ये येऊन तीस वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामध्ये अनेक चढ-उतार पाहिले. चांगले वाईट अनुभव घेतले. परंतु मागील काही दिवसापासून ज्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये माझी वाटचाल सुरू आहे त्यामुळे अनेकदा बाहेरही याबाबत कौतुक झाले आहे. छोट्या शहरांमध्ये राहून अशा प्रकारची विविधतेने नटलेली शाळा निर्माण करणे हे खरे तर खूप अवघड बाब आहे. तरीही लोक आम्हाला वेडे म्हणतात त्याचप्रमाणे मी ध्येय वेडा आहे असे मी समजतो. शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन संकल्पना राबवणे त्यासाठी पैसा किती लागतो याकडे मी कधीच लक्ष दिलेले नाही. माझ्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मी जगातील शिक्षण पद्धती किंवा नवनवीन संकल्पना काय आहेत त्याचा फायदा या विद्यार्थ्यांना व्हावा यामागे हाच माझा हेतू असतो. हे सर्व करत असताना नाविन्यपूर्ण कल्पना राबवणारी शाळा म्हणून हा पुरस्कार मिळालेला आहे. एका छोट्याशा गावामध्ये आमच्याकडे रोबोटिक लॅब, व्हीआर लॅब, एआय वर आधारित पुस्तके आहेत. यापुढेही नाविन्यपूर्ण प्रयोग करत राहणार आहोत या सर्व प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे सहकार्य तसेच शुभेच्छांनी मला प्रेरणा मिळते असे यावेळी सांगितले.याप्रसंगी डॉ. राजेंद्र मुळावरेकर यांनी मांगी थी एक दुवा जो कबूल हो गई या गीताचे सुंदर असे सादरीकरण केले. या गीतामधून त्यांनी डॉ. रोडगे यांच्यासाठी एकप्रकारे ऊर्जात्मक नवचैतन्य यावे आणि आपण अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी असे यामधून व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.