माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर व महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्यामध्ये खरी चुरस
प्रचारामध्ये आघाडीवर असणारे सध्याचे परिवर्तन आघाडीचे डॉक्टर सुजित मिणचेकर व महायुतीचे अशोकराव माने (बापू) यांच्यामध्ये खरी चुरस होण्याची शक्यता असल्याचे काही राजकीय जाणकारांची मते असून
हातकणंगले मतदारसंघात समप्रमाणात स्वताचे अस्तित्व टिकवून ठेवलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे) याची भुमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.
मनसेचे पारडे ज्या बाजुला झुकणार व हुपरी भागातील नदीपलीकडील आठ गाव जिकडे कल देणार तो आमदार होणार. हातकणंगलेतुन मनसेच किगंमेकर ठरणार हे नक्की
खरं वास्तविक पाहता भाजप महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांचा जनसंपर्क असून
त्यांना काही अंतर्गत गटबाजीचा त्रास होण्याची शक्यता दिसत आहे.
महायुतीची कार्यक्रर्ते एकसंध राहणार का यावर अजून बरेच राजकारण अवलंबून आहे.
डॉक्टर सुजित मिणचेकर हे शिवसेना (उबाठा) गटाचे असून
शिवसेनेचे कट्टर असणारे काही कार्यकर्ते हे काँग्रेसला कदापी मतदान करणार नाहीत
ती शिवसेनेची मते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मते व वैयक्तिक सुजित मिणचेकर गट असो मिणचेकर यांचा जनसंपर्क व गोकुळ संचालक असल्याने लोकांची कामे करणारा माणूस अशी ओळख निर्माण झाली व अशी मोट तयार होऊन डॉक्टर सुजित मिणचेकर यांचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे.
आमदार राजू बाबा आवळे यांना गेल्या वेळी प्रमाणे अशोकराव माने व सुजित मिणचेकर यांच्या लढती मधे किरण काबंळे यानी 20 हजार मते घेतली होती त्यात राजू बाबा यांना फायदा झाला
परंतु त्या गोष्टीचा त्यांनी हातकलंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणताही वापर केला नाही निवडणुकीपुरते नारळ वाढवुन गाजावाजा केला.
इलेक्शन पुर्वीस्वताचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये जोरदार फटका बसण्याची शक्यता असल्याचे काही राजकीय कट्ट्यावर चर्चा दिसून आली.
टिप्पण्या