खोतवाडी हायस्कुल, खोतवाडी येथे पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कुल,खोतवाडी येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांचे हस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन संपन्न झाले.
यानंतर विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री.हेमगिरे एस.के.यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनाविषयी माहिती आपल्या मनोगतातुन सांगितली.तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कार्या विषयी माहिती सांगुन बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.समाजे सी.बी.यांनी केले.तर आभार श्री.हेमगिरे एस.के.यांनी मानले.
टिप्पण्या