यड्रावमध्ये डॉ . राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयाचा जल्लोष
यड्राव (प्रतिनिधी ) शिरोळ विधानसभा मतदार संघातून राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार आमदार डॉ . राजेंद्र पाटील यड्रावकर हे ४१ हजार १९६ मत्ताधिक्य घेऊन दुसऱ्यांदा विजयी झाले , हे समजताच गावात फटाक्याची आतीषबाजी व गुलालाची उधळण करत गावातून जल्लोष मोटरसायकल रॕली काढण्यात आली . विधानसभा निवडणूकीच्या प्रचार सभेत यड्राव गावच्या सुज्ञमतदारांनी आमदार डॉ . राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवडून देणार असा दिलेला शब्द तो आज मतपेटीतून दाखवून दिला आहे , आणि दुसऱ्यांदा त्यांना शिरोळ तालुक्याची धूरा साभांळण्यासाठी आमदार म्हणून निवडून दिले . यड्राव गावचा शब्द म्हणजे शब्द हे आज खरे ठरले आहे . विजयाच्या जल्लोषात गावातील अबालवृध्द हे गुलालात न्हावून गेल्याचे संपूर्ण गावात पहावयास मिळत होते . तसेच गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहापूर पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता . यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक - निबांळकर , ग्रा . प . सद्स्य रंगराव कांबळे , माजी सरपंच उल्हास भोसले , अक्षय भोसले (मेजर ) , नितीन कांबळे , सूधीर आदमाने , बंडू दावाडे , सचिन मगदूम , सुजीत गरड , राकेश पाटील , सुकूमार क्षिरसागर , दत्तात्रय सोळोखे , सूधीर कांबळे , गुरुनाथ ढोबळे , प्रमोद कांबळे , विपूल दानोळे , रोहित कदम , आदिसह गावातील सर्व यड्रावकर प्रेमी व कार्यकर्ते उपस्थित होते .
टिप्पण्या