यड्राव येथे शांततेत 77 . 51 % मतदान
यड्राव (प्रतिनिधी ) यड्राव येथे चूरशीने शांततेत 77 . 51 % मतदान पार पडले . येथे प्रत्येक केंद्रावर मतदारांचा उत्साह व मतदानासाठी मतदारांच्या लांबच्यालांब रांगा लागल्या होत्या . येथे एकूण मतदान 7231 त्यापैकी 5605 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . मतदान केंद्रास डॉ . राजेंद्र पाटील यड्रावकर व उल्हास पाटील आदि उमेदवार यांनी भेट दिली . सांयकाळी 7 वाजेपर्यंत मतदान प्रकिया चालू होती . मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
टिप्पण्या