26 नोव्हेंबर रोजी हर घर संविधान पत्राचे वाचन उपक्रम सक्तीचा करावा.बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे केली विनवणी.
भारत देश स्वातंत्र्यानंतर अंमलात आलेल्या भारतीय राज्यघटनेला यंदा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने भारतीयांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असून केंद्र व राज्य सरकारने संविधान दिना रोजी हर घर संविधान पत्राचे वाचन, हा उपक्रम राबवून त्याची अंमलबजावणी करावी असे बोरगांव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र पाठवून, हा उपक्रम सक्तीचा करण्याची मागणी केली आहे.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एकतंत्र, एकसंघ ,नागरिकत्व व समता, बंधुत्व, स्वातंत्र्य प्राप्त व्हावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला पवित्र अशी लिखित स्वरूपाची राज्यघटना अमलात आली. सर्व मानाव जातीला एक जगण्याचा महान अधिकार मिळाला.
प्रत्येक भारतीयाला जगण्यासाठी जसं अन्न वस्त्र निवारा व प्राणवायू ची आवश्यकता असते त्याच बरोबर नागरिकांना माणूस म्हणून जगताना संविधानाचा आधार घेतल्याशिवाय जगणे मुश्कील आहे. कारण संविधान हे सर्वांच्या उपयोगी असणारा एक पवित्र ग्रंथ असून येणाऱ्या २६ नोव्हेंबर रोजी देशाच्या सर्व स्तरावरील कार्यालये संस्था, शाळा कॉलेज, येथे हा उपक्रम राबवुन नोकरदार, पुरुष महिला, युवक युवती विद्यार्थी व सामान्यांना संविधानाचे महत्त्व पटवून देण्यास हा उपक्रम महत्वाचा ठरणार आहे.
याबाबत बोलताना तुषार कांबळे म्हणाले. की आज आपल्या देशाची राज्यघटना अमलात येऊन यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकांच्या जीवनात हा एक ऐतिहासिक क्षण आहे. ज्याप्रमाणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्र सरकारने साजरा करुन, हर घर तिरंगा उपक्रम साजरा केला त्याच धर्तीवर केंद्र सरकार व राज्य सरकारने राज्यघटनेचे महत्त्व ओळखून, हर घर संविधान पत्राचे वाचन, हा उपक्रम राबवून संविधानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आपण ही मोहीम सुरू केली आहे.
तुषार कांबळे यांनी बोरगांव चे मुख्याधिकारी, तालुका तहसीलदार, असिस्टंट कमिशनर, जिल्हाधिकारी कार्यालय,व भारताच्या लोकप्रिय राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना आपण पत्र पाठवून हर घर संविधान पत्राचे वाचन करण्याची मागणी केली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांना भारतीय सविधांचे महत्त्व समजावे यासाठी तुषार कांबळे यांनी केलेल्या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पण्या