अकिवाट येथील गायरान जमिनीवरील इंडस्ट्रियल इस्टेटप्रश्नी मी गावकऱ्यांच्या पाठीशी : गणपतराव पाटील यांची ग्वाही

शिरोळ : 
प्रतिनिधी सचिन मठपती 
अकिवाट येथील गायरान जमिनीवर इंडस्ट्रियल इस्टेट झाल्यास येथील ग्रामस्थांना आणि परिसरातील नागरिकांना प्रचंड मोठा त्रास आणि अडचण होणार आहे. त्यामुळे तेथे इंडस्ट्रियल इस्टेट न करता गायरानची ही जागा कायमस्वरूपी गायरानच म्हणूनच राहील यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. गावकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीर राहीन, असे आश्वासन शिरोळ विधानसभेचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी दिले. तसेच अकिवाट येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या जमीन क्षारपड मुक्तीच्या कामात खंड पडला असून हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो, अशी ग्वाहीही त्यांनी दिली अकिवाट येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित पदयात्रा, रॅली काढल्यानंतर झालेल्या विजय निश्चय सभेत ते बोलत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.