डॉ. कुलदीप गजरे इंडियन डॉक्टर प्राइड व राष्ट्रीय चिकित्सक सेवा सन्मान अवॉर्डने सन्मानित.

बुलढाणा प्रतिनिधी - कोरोना काळाबरोबरच इतर वेळेत वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून केलेल्या समाजभिमुख कार्याची दखल घेत धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटल क्षयरोग ( टी .बी. डिपार्टमेंट) येथे कार्यरत असणारे अधिकारी डॉ .कुलदीप  गजरे यांना रियल हिरो ऑफ इंडिया अवॉर्ड 28 ऑक्टोबर 2023  वाराणसी येथे प्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरी यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आला.
             पुरस्कारासाठी भारतातून केवळ 30 तर राज्यातून तीन डॉक्टरची निवड करण्यात आली होती .रियल हिरो ऑफ इंडिया अवार्ड साठी निवड झालेले डॉ. कुलदीप गजरे जिल्ह्यातील एकमेव डॉक्टर आहेत .  यावर्षी सुद्धा नवी मुंबई ताज हॉटेल येथे 10 नोव्हेंबर 2024 ला डॉ. कुलदीप गजरे यांना सुप्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते इंडियन डॉक्टर प्राईड अवार्ड सेकंड अवॉर्ड डॉक्टर शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय चिकित्सक सेवा सन्मान अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.  अवॉर्ड डॉ. कुलदीप गजरे यांना कोरोना काळात असामान्य पर्यंत सेवा दिल्याबद्दल सामाजिक बांधिलकी जोपासत वैद्यकीय सेवा करतात कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. ज्या रुग्णांना नातेवाईक हात लावण्यास घाबरत होते, अशा रुग्णांच्या मदतीला डॉक्टर कुलदीप गजरे धावून जात.  डॉक्टर कुलदीप गजरे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं वैद्यकीय क्षेत्रासह सर्वत्र क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.