श्री गुरुकृपा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून वाहन वितरण.
जनवाड वार्ताहर. जनवाड ता चिकोडी येथील श्री गुरुकृपा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जनवाड या संस्थेच्या वतीने दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सभासदांना सुलभ व अत्यल्प व्याज दराने नवीन वाहन खरेदीसाठी नवीन वाहन आपल्या दारात याप्रमाणे सभासदांना वाहन वितरण केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री उदय कुमार चौगुले. श्री सिदगोंडा मोकाशी. श्री संतोष मगदूम यांच्या उपस्थितीमध्ये वितरण करण्यात आले
संस्था डिजिटल युगामध्ये गतिमान सेवा देत आहे व येत्या काही काळामध्ये संस्था व्यवसायाच्या दृष्टीने सर्व उद्दिष्ट पूर्ण करेल त्याचबरोबर गोरगरीब गरजवंत सभासदांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा आमची संस्था करत आहे असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष श्री धनाजी मगदूम यांनी व्यक्त केला
या वितरण प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री धोंडीबा खापरे. संचालक श्री दत्तात्रय मगदूम. संजय हांडे. जगदीश पाटील. आनंदा नवले. पिरगोंडा मुढाळे. दशरथ पुजारी. महादेव मुधाळे. स्वप्निल बन्ने. संगीता सुखदेव जांगडे ज्योती पा. खोत. त्याचबरोबर संस्थेचे मॅनेजर श्री सोमनाथ स्वामी व क्लार्क पुष्पक जांगडे तसेच सर्व सभासद हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी संचालक श्री पिरगोंडा मुधाळे यांनी सर्वांचे आभार मानले.
टिप्पण्या