खोतवाडी हायस्कूल खोतवाडी येथे संविधान दिन साजरा

शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल,खोतवाडी येथे संविधान दिन उत्साहात संपन्न झाला.
        कार्यक्रमाची सुरवात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने व संविधान पुजनाने झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन संपन्न झाले.
          यानंतर सामुदायिक संविधान वाचन करण्यात आले. इयत्ता 10 वी तील विद्यार्थीनी कु.मोनिका प्रदिप शिंदे हिने भारतीय संविधानाचे वाचन केले .या सोबत विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनीनी देखील सामुदायिकपणे भारतीय संविधान वाचन केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन भारतीय संविधाना विषयी व संविधानाचे महत्व तसेच संविधानाची निर्मिती करताना लागलेला कालावधी या विषयी माहिती सांगितली.
             या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.   
            या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री हेमगिरे एस.के.यांनी केले तर आभार श्री.समाजे सी.बी.यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.