एकरी 100 टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा गौरव.भोजमध्ये कोरे कारखान्याच्या अधिकाऱ्याकडून भेट
चिक्कोडी:- स्थानिक चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी कारखान्याचे शेतकरी सभासद श्री.दादासाहेब साताप्पा चौगले, भोज गावचे ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या मार्गदर्शन व सुविधांचा वापर करून एकरी प्रति 100 टन उसाचे उत्पादन घेतले आहे. साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या वतीने 2024-25 च्या ऊस तोडणी हंगामात बुधवारी महाव्यवस्थापक श्री. एन.एस हिरेमठ यांनी ऊस मळ्याला भेट देऊन एकरी 100 टन ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक म्हणाले की, राज्यसभेचे माजी सदस्य आणि केएलई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे आणि राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळ, नवी दिल्लीच्या संचालक श्री. अमित कोरे आणि साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन कोरे यांच्या निर्देशानुसार कारखान्यापासून ऊस विकास प्रकल्पावर भर दिला. प्रति एकर 100 टन उसाला प्रोत्साहन दिले जाते.
उत्पादन वाढले तर शेतकरी व कारखान्याला फायदा होईल. त्यामुळे सर्व सभासदांनी कारखान्याच्या ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा व आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करावा, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी कारखान्याचे ऊस विकास पर्यवेक्षक राहुल इचलकरंजी सचिन मोपगर, ऊस पर्यवेक्षक उदय कागले, तात्यासाब मत्तीवडे, ऊस तोडणी व वाहतूक लिपिक मल्लिकार्जुन होस्पेठ व कर्मचारी व गावातील शेतकरी उपस्थित होते.
टिप्पण्या