एकसंब्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांची माहिती.
एकसंबा, तालुका चिकोडी येथील नगरपंचायतीच्या नूतन इमारतीसाठी २.५० कोटी तर शहराच्या मूलभूत विकासासाठी २.५० कोटी असा एकूण ५ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती विधानपरिषद सदस्य व राज्य सरकार दिल्लीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी दिली.
ते एकसंबा येथे नगरपंचायत कार्यालयासमोर निधी मंजूर केलेल्या मंजुरी पत्राचे नगराध्यक्ष सुनील सप्तसागरे व नगरसेवकांना वितरण करून बोलत होते. हुक्केरी म्हणाले, एकसंबा ग्रामपंचायतीवर आपले वडील बाबण्णा हुक्केरी यांनी प्रथम अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. त्यांनंतर १९७८ मध्ये आपण स्वतः अध्यक्ष म्हणून काम केले आहे. एकसंबा ग्रामपंचायत अध्यक्ष ते जिल्हा पंचायत सदस्य, विधान परिषद सदस्य,
आमदार, मंत्री, खासदार व कर्नाटक सरकार दिल्लीचें विशेष प्रतिनिधी म्हणून जबाबदाऱ्या पार पाडताना विकासासाठी सतत प्रयत्न केले.
यावेळी आमदार गणेश हुक्केरी, प्रांताधिकारी सुभाष संपगावी, नगराध्यक्ष सुनील सप्तसागरे, उपनगराध्यक्ष सुजाता
चितळे, रत्नाप्पा बाकळे, अंकुश खोत, रवींद्र खोत, रवींद्र माने, पुंडलिक कबाडे, कृष्णा माळी, मारुती माने, सुभाष कल्याणी, दस्तगीर अवटी, उमेश सातवर, शिवगौडा बावचे, चिदानंद बेळळी यांच्यासह नगरसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या