जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, पाच जणांवर कारवाई

शिरोळ प्रतिनिधी

जांभळी टाकवडे मार्गावरील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
पाच जणांवर कारवाई २० हजाराचा मुद्देमाल हस्तगत
अवैद्य धंद्यांचा बिमोड करण्यासाठी शिरोळ पोलिसांनी कारवाईचे धाडसत्र सुरू केल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. गुरुवारी रात्री जांभळी टाकवडे मार्गावरील रस्त्यावर एका खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत पत्त्याच्या पानाचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांच्या विरोधात कारवाई करत २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जांभळी टाकवडे मार्गावरील प्रकाश शेंडगे यांच्या मालकीच्या खोलीत पत्त्याच्या पानाचा जुगार सुरू असल्याची माहिती शिरोळ पोलिसांना मिळाली पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून पैसे लावून रमी नावाचा पत्त्याचा जुगार खेळणाऱ्यां पाच जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल असा २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पत्त्याच्या पानाचा जुगार खेळणारे विजय विलास पाटील, मानतेश उर्फ आप्पासाहेब कल्लाप्पा चौगुले, ऋतिक दीपक निर्मळ इस्माईल अल्लाउद्दीन शेख अभिजीत रामचंद्र कोळी सर्व राहणार टाकवडे यांच्या विरोधात शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी रहिमान रमजान शेख यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.