जिंतूर मतदारसंघातून 24 उमेदवारांची माघार.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 


जिंतूर :दि.04 जिंतूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत म्हणजे सोमवारी (दि.04) एकूण 24 उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली.या मतदार संघात 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 24 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्या मुळे आता रिंगणात 17 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. या मतदारसंघातून प्रेक्षा विजय भांबळे, मुंजाजी साहेबराव कदम, अंकुश सिताराम राठोड, प्रदिप उर्फ बाळासाहेब काजळे, खंडेराव किशनराव आघाव, पुष्पराज प्रकाश देशमुख, बालाजी माधव शिंदे, राजेश भगवानराव भिसे, विजय माणिकराव चव्हाण, शरद सुदाम चव्हाण, समीर गणेश राव दुधगावकर, ज्ञानेश्‍वर देविदास राठोड, ज्ञानेश्‍वर नुरा राठोड, अमृता सुरेश नागरे, पांडुरंग भास्कर राव कदम, प्रसाद ज्ञानेश्‍वर काष्टे, स्वाती बालासाहेब नखाते, कृष्णा त्रिंबकराव पवार, दिनकर धारोजी गायकवाड, सुखदेव गोकुळ सोळंके, अमोल भिमराव सरकटे, विष्णू दगडू ढोले, अनिल सयाजी आंबुरे व गणेश जगन्नाथ काजळे यांनी आपआपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आता 17 उमेदवार निवड णूकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.