खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये शालेय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न
शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित, खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर येथे शालेय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाची सुरवात पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविकेने झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी प्रास्ताविक केले.तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देवुण केले. या कार्यक्रमासाठी विज्ञान प्रदर्शन उद्घाटक अतिथी मा.श्री.प्रविण फाटकसो(अधिक्षक माध्य.शिक्षण विभाग जि.प.कोल्हापुर),प्रमुख अतिथी मा.श्री.समीरसिंह साळवे(डी.वाय.एस.पी.इचलकरंजी)तसेच प्रमुख उपस्थिती खोतवाडी गावचे सरपंच मा.श्री.विशाल कुंभार,उपसरपंच मा.श्रीमती निर्मला खोत वहिनी,ग्रामपंचायत सदस्य मा.श्री.गजानन नलगे,माजी सरपंच मा.श्री.संजय चोपडे,तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद माने, प्रमोद पाटील सर तारदाळ गावचे वतनदार पाटील मा.श्री.गुरुकुमार पाटील,सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.वैभव पवार,मा.श्री.करण खोत,तारदाळचे माजी उपसरपंच मा.श्री.चंद्रकांत तांबवे,मा.श्री.विजय मांजरे तसेच पत्रकार मा.श्री.गजानन खोत,मा.श्री.दिलीप खोत,मा.श्री.बसगोंडा कडिमनी यांची उपस्थिती लाभली.
या नंतर शालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. मा.श्री.प्रविण फाटकसो साहेब ( अधिक्षक माध्य.शिक्षण विभाग जि.प.कोल्हापुर) व मा. श्री.समीर सिंह साळवे (डी.वाय.एस.पी.इचलकरंजी) यांचे हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.या विज्ञान प्रदर्शनामध्ये जीवनातील आव्हानासाठी वैज्ञानिक उपाय,दळणवळण, ऊर्जा साधन संपत्ती,आरोग्य, स्वच्छता,तंत्रज्ञान, कृषी या विषयावर आधारित उपकरणे करण्यात आली.इयत्ता 5वी ते 7वी गटात 10 उपकरणे,इयत्ता 8 वी ते 10 वी गटात 14 उपकरणे व प्रयोगशाळा परिचर 01अशी एकुण 25 उपकरणे मांडण्यात आली.या साठी विज्ञान विभागाचे प्रमुख सौ.धारवट एम.एम.,तसेच विज्ञान शिक्षक श्री.मगदुम एस.बी.,श्रीमती पाटील जे.के.,श्री.शिकलगार एफ.आय.,सौ.घुबडे एस.आर.,श्री.पाटील डी.पी.,सौ.पाटील एम.एम.यांचे मार्गदर्शन लाभले.हे प्रदर्शन पाहण्यासाठी खोतवाडी,तारदाळ गावातील पालक,माजी विद्यार्थी, परिसरातील इतर शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
तसेच मुलांना खरेदी-विक्री,नफा-तोटा या गोष्टी शिकता याव्यात यासाठी फुडस्टॉल मांडण्यात आला.याचा सर्व विद्यार्थी-विद्यार्थ्यानी लाभ घेतला.
दुपारच्या सत्रात मा.श्री.शरद कुंभार सर यांचा बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमातुन त्यांनी सगळ्यांचे मनोरंजन केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर,विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांचे विशेष मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थीनी, शिक्षक -शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, पालक,माजीक विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.समाजे सी.बी व श्री.हेमगिरे एस.के.यांनी केले.आणि शेवटी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पण्या