खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे क्रीडा महोत्सवास प्रारंभ
शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल,खोतवाडी येथे क्रीडा महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
कार्यक्रमाची सुरवात क्रीडा ज्योतीच्या आगमनाने झाली.यानंतर प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चूडाप्पा सर व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले. या नंतर ध्वज पुजा व ध्वजारोहण करण्यात आले. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांच्या हस्ते क्रीडाध्वज पुजा करण्यात आली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर यांच्या हस्ते ध्वजारोहण व मैदान पुजन करण्यात आले.यानंतर पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन विद्यार्थी -विद्यार्थीनींना खिलाडुवृत्तीने कसे खेळावे,आपल्या जीवनात खेळाचे महत्व काय आहे.हे मनोगतातुन व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.सागर चुडाप्पा सर यांनी सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींना क्रीडा महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक- शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. समाजे सी.बी.व श्री.हेमगिरे एस.के यांनी केले तर क्रीडा प्रमुख श्री.चौगुले एस.बी.यांनी आभार मानले.
टिप्पण्या