सदलगा ते शिमोगा, भद्रावती बसला मलिकवाडमध्ये थांबा मंजूर. प्रवाशी, विद्यार्थ्यांची गैरसोय दूर, पिरगोंडा पाटील यांचे प्रयत्न

प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.

चिकोडी सदलगा-शिमोगा वh सदलगा-भद्रावती या जलद बसेसना मलिकवाड (ता. चिकोडी) येथे थांबा मंजूर करण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून ही बस सुरू असून याला मलिकवाड येथे थांबा देण्याची मागणी होती. त्यासाठी सदलग्याचे समाजसेवक पिरगोंडा पाटील यांनी शिमोगा येथे परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा थांबा मंजूर करून घेतला आहे. तात्काळ याची कार्यवाही करण्याचे आदेश शिमोगा परिवहन अधिकाऱ्यांनी काढले आहेत.
याबाबत श्री. पाटील यांनी दिलेली माहिती, शिमोगा-सदलगा आणि भद्रावती-सदलगा अशा दोन बस 2010 पासून सुरू आहेत. या भागातून बेळगावसह लांब पल्ल्यासाठी जाणाऱ्या बस प्रवाशांना सोय झाली होती. सकाळी जाण्यासाठी व संध्याकाळी परतण्यासाठी या भागातील या बस उपयुक्त ठरल्या आहेत. पण या बसेसना मलिकवाड येथे थांबा नसल्याने सकाळी आणि रात्री मलिकवाडकडे येणाऱ्या प्रवाशी व विद्यार्थ्यांना बस नसल्याने गैरसोय होत होती. त्यांना एकसंबा येथे उतरून अन्य वाहनाने मलिकवाडला जावे लागत होते. याची दखल घेऊन पिरगोंडा पाटील यांनी मलिकवाडला माजी सैनिकांची संख्या अधिक असून व सैन्य दलातील सैनिकांची व त्यांच्या कुटुंबांची गैरसोय टाळण्यासाठी या बसला विनंती थांबा देण्यासाठी पत्र दिले होते. पुढील स्टेजचे तिकिट आकारून येथे थांबा द्या, पण लोकांची गैरसोय थांबवा, असे निवेदन त्यांनी दिले होते. त्याची दखल घेत शिमोगा परिहवन महामंडळाचे विभागीय नियंत्रक नवीनकुमार व विभागीय संचार नियंत्रक दिनेश, होन्नळ्ळी व भद्रावती येथील आगार प्रमुखांनी यांनी सदलगा-शिमोगा व सदलगा-भद्रावती या दोन्ही बसेसना मलिकवाड येथे थांबा देत प्रवाशी घेणे व उतरण्यास अनुकूल करून देण्यची सोय केली असल्याचे सांगितले. त्याप्रकारे त्यांनी पत्रक काढून सर्व नियंत्रकांना याची माहिती दिली आहे. या बसला थांबा मिळाल्याने विद्यार्थ्यासह आजी-माजी सैनिकांची गैरसोय दूर होणार असल्याचे श्री. पाटील यांनी म्हटले आहे. पाटील यांच्या प्रयत्नातून मलिकवाडला या बसेसना थांबा मिळाल्याने त्यांचे मलिकवाड येथील नागरीक, विद्यार्थी, आजी माजी सैनिक, नागरीक व प्रवाशांतून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.