पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अबंप . ता . हातकणंगले येथील २२ व्या छ . शंभूराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलना साठी मान्यवरांच्या निवडी . १६ फ्रेबुवारी २५ रोजी होणार संमेलन .

इमेज
हातकणंगले प्रतिनिधी रविवार दिनांक १६ फ्रेबुवारी २५ रोजी सकाळी ८  वाजता  अ अबंप ता हातकणंगले जि कोल्हापूर येथील विवेक वाचनालय अबंप आणि  कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित  राज्यस्तरीय २२ वे छ. शंभूराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .संमेलन अध्यक्ष म्हणून  साहित्यिक  मा तानाजी आसबे सर वाळवे खुर्द हे भूषवणार आहेत तर उद्घाटक मा प्रा सागर बगाडे सर असून प्रमुख पाहुणे कांदबरीकार लेखक दि .बा .पाटील कामेरी व प्रमुख अतिथी कु आशू .मेश्राम सिने अभिनेत्री  गडचिरोली या उपस्थित राहणार आहेत . सकाळी ८.३० ग्रंथ दिंडी असून त्यांचे उद्घाटन सौ दिप्ती विभासराव माने सरपंच अबंप यांचे हस्ते होणार असून ग्रंथदिंडी पुजन मा बी टी पाटील विवेक वाचनालय अध्यक यांचे हस्ते होणार असून मा काकासो पाटील मा डॉ बी के पाटील 'मा विजयसिंह माने मा राजवर्धन पाटील बी के माने सर मा राजेंद्र माने सर यांची उपस्थिती अरुणार  . स्वागताध्यक्ष मा महादेव बापू डोंगरे  तर प्रास्ताविक मा तुकाराम  भाऊसो निलजे करणार आहेत . उद्घाटन सत्रात पत्रक...

यशवंत प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलन साजरे झाले.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  सेलू : सेलू येथील यशवंत प्राथमिक शाळे मध्ये आज दि. 30 जाने.रोजी वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाले.या स्नेहसंमे लनाच्या अध्यक्षस्थानी  यशवंत शिक्षण प्रसा रक मंडळाचे अध्यक्ष मुकेश हरिभाऊ काका बोराडे, संचालक साईराजभैय्या, तर प्रमुख पाहुणे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक माधव गव्हाणे सर होते.या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती मध्ये व्यंकटराव चव्हाण, राजेश झोडगावकर व डॉ.शिवाजी शिंदे, यशवंत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  गोरे सर व यशवंत विद्यालयाचे मुख्या ध्यापक  थटवले सर आदींची उपस्थिती  होते.कार्यक्रमची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन  करून करण्यात आली.या नंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. कार्य क्रमाचे प्रास्ताविक गोरे सर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय थटवले सर यांनी दिला. माधव गव्हाणे सर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले त्याचबरोबर विविध उपक्रमांची माहिती दिली. विविध गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.विविध क्रीडा स्पर्धा  सांस्कृतिक ...

हुपरीत प्रथमच २ फेब्रुवारीला"यादोंकी बारात" संगीत रजनी महंमद रफी यांच्या गाण्यांची सुरेल मैफिल

इमेज
हुपरी:  संगीतप्रेमी संघटना हुपरीच्या वतीने ज्येष्ठ गायक स्व. महंमद रफी यांच्या गाण्यांच्या सुरेल मैफिलीचे आयोजन केले असून महंमद रफी फेम गायक इब्राहिम कोझी हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे. हुपरी शहरांमध्ये प्रथमच होत असलेल्या स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या सुरेल गीतांची मैफल  श्री अंबाबाई मंदिर खुले नाट्यगृह प्रांगण येथे रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी रात्रौ ९ वा. या कार्यक्रमाचे आयोजन केले असून  जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे संगीतप्रेमी संघटना हुपरीचे अध्यक्ष उमेश दैने यांनी सांगितले आहे.  कोल्हापूरच्या सुतार बंधू यांच्या प्रसिद्ध "झंकार ऑर्केस्ट्रा" यांचेकडे या कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले आहे.  या कार्यक्रमात इब्राहिम कोझी यांचेबरोबरच पुणे, मुंबई येथील नामवंत गायक गायिका कलाकार  आपले कलाकौशल्य सादर करणार आहेत.  या कार्यक्रमासाठी प्रवेशिकांसाठी खालीलप्रमाणे संयोजक उमेश दैने, प्रकाश वाळवेकर, बाळासोा ऐनापूरे, जावेद कलावंत, प्रकाश ककडे, धैर्यशिल पाटील, उमेश पडवळ, जमिर कलावंत, राजेंद्र पाटील (RJP), धनंजय खाडे, ...

महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी

इमेज
प्रतिनिधी:रियाज जैनापुरे २६ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारत देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो यांचं दिवशी महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेले  भारतीय संविधान लागू करण्यात आले आणि याच दिवशी खऱ्या अर्थाने भारतीय लोकांना त्यांचे मूलभूत हक्क अधिकार स्वातंत्र्य मिळाले पण याच दिवशी अमरितसर पंजाब मध्ये एका व्यक्तिकडून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची आणि भारतीय संविधान असलेल्या शिल्पाची तोडफोड करण्यात आली तसेच भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत असताना‌ पायातील बूट न काढता त्यांचे पुजन केले या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना या निवेदनाद्वारे संबंधित व्यक्तिवर कठोरातील कठोर शासन व्हावे या मागणीचे निवेदन आंबेडकरवादी सेनेकडून जिल्हाअधिकारी कार्यालयात देण्यात आले. तसेच कोल्हापूर महापालिकेच्या संबंधित प्रशासकीय अधिकारी वर गुन्हा दाखल करण्यात यावे यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांना जाहिर ...

७ फेब्रुवारी रोजी आयटकचा कामगार कार्यालयात घेरावा व ठिय्या आंदोलन - कॉ. आनंदा गुरव

इचलकरंजी    मंडळाची वेबसाईट व पोर्टल केवळ तालुका सुविधा केंद्रावर सुरू ठेवल्यामुळे बांधकाम कामगार नोंदणी, नूतनीकरण व लाभापासून बहुसंख्येने वंचित राहत पहाटे पासुन टाककळत उभा रहावे लागत असल्याने पोर्टल पुर्वी प्रमाणे सुरु करावे  व इतर प्रमुख मागण्यांच्यासाठी महाराष्ट्र  बांधकाम कामगार संघटना ( आयटक) वतिने 7 फेब्रुवारी  रोजी कामगार कार्यालयाला घेराव व ठीय्या  आंदोलन        .    केवळ ठेकेदारांना पोसनेसाठी  विधानसभा निवडणुकीच्या आचारसहितेपासून मंडळाचे नोंदणी नूतनीकरण व लाभा संदर्भातील सर्व कामकाज तालुका सुविधा केंद्रावर केंद्रात केल्याने बांधकाम कामगारांची सुविधा होण्याऐवजी प्रचंड गैरसोय व समस्या निर्माण झालेल्या आहेत. हे केवळ कंपन्यांचे भले करण्याचा डाव आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये गेल्या दोन वर्षात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे व मंडळाचे हजारो कोटी म्हणजे 75 टक्के पैसे ठेकेदारांवर उधळून संपवलेले आहेत‌.  त्याचे ऑडिट होऊन ताबडतोब चौकशी व्हावी.    .      ...

छत्रपती ग्रुप यांच्यावतीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना भटक्या कुत्र्याबाबत निवेदन

इमेज
हुपरी प्रतिनिधी-सागर पाटील. छत्रपती ग्रुप हुपरी शहर यांच्या वतीने आज दि. 27 जानेवारी 2025 रोजी हुपरी शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती समस्या आणि त्यावर उपाययोजना करण्याबाबत प्रशासकीय अधिकारी हुपरी नगरपरिषद हुपरी यांना निवेदन देण्यात आले. हुपरी शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे विशेषतः मुले, वृद्ध आणि पाळीव प्राणी यांना अधिक धोका आहे.    आणि आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातून घेतलेल्या माहिती नुसार मागील काही महिन्यात गावातील भटक्या कुत्र्याने चावा घेतलेले पेशंट खूप वाढले आहेत.त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात त्याची सर्व गांभीर्य आम्ही निवेदनाच्या द्वारे नगरपरिषदेला दिली आहे. * [गावातील आरोग्याकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत असुन भटकी कुत्री गाडीच्या आडवी येऊन अपघात घडणे लहान मुले खेळत असताना त्याचा चावा घेणे असले काहीसे प्रकार होत असुन नगरपरिषद यानी तात्काळ उपाययोजना करावी.] *    यावेळी उपस्थित छत्रपती ग्रुपचे सौरभ खोत,शिरोळ तालुका प्रमुख संदीप पवार, शुभम चोपडे,उमाजी लाड,संग्र...

मा.निलेश बन्ने विचारमंच वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

इमेज
वार्ताहर - रियाज जैनापुरे     वडणगे येथे कन्या विद्यामंदिर आणि कुमार विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मा.निलेश बन्ने विचारमंच वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा सन्मानीय सत्कार करण्यात आला.यामध्ये कुस्ती, निबंध स्पर्धा, लाठीकाठी,कराटे, शिष्यवृत्ती अशा विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना प्रमाणपत्र व पुष्प देऊन सन्मानिय सत्कार करण्यात आला.तसेच वर्षभर शासनाच्या वतीने देण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहार माध्यमातून सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जेवू घालणारे शालेय पोषण आहार मदतनीस महिलांचा निलेश बन्ने विचारमंच वतीने शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानिय सत्कार करण्यात आला.यावेळी कन्या विद्यामंदिर आणि कुमार विद्यामंदिर मुख्याध्यापक चोपडे सर,शिक्षिका योगिता गायकवाड, पोतदार मॅडम,काटकर मॅडम, आणि सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.विचारमंच अध्यक्ष निलेश बन्ने,प्रथमेश तेलवेकर,सलीम मोमीन, अरविंद ...

यड्राव येथे विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा .

इमेज
यड्राव (प्रतिनिधी ) येथे विविध ठिकाणी 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .                                  * कुमार व कन्या विद्या मंदिर --   येथे ध्वजाचे पुजन ग्रा . प . सद्स्य रंगराव कांबळे व सारंग काकडे यांनी केले . तर ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ . चिमाताई आदमाने व उपाध्यक्षा  सौ . सुप्रिया मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले .                                      यावेळी पत्रकार संतोष साने , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चवगोंडा पाटील , अध्यक्षा रिया?  प्रभाळकर , अभिजीत उपाध्ये , मुख्याध्यापक डी . के . पाटील , मुख्याध्यापक आंबी सर , सर्व शिक्षक स्टाफ , ग्रामस्थ व विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते .                                      ...

साईराज बोराडे मित्र मंडळ आयोजित एस पी एल 2025 चे उद्घाटन संपन्न.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.  विजेत्यांना आजपर्यंत च्या सर्वात मोठ्या ट्रॉफी चे आकर्षण. सेलू :आज दि.26 जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थिती त एस पी एल चे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष विनोदबोराडे,प्रभाकरजी सुरवसे,मारोती चव्हाण,मिलिंद सावंत, लोकुलवार अण्णा, वहिद अन्सारी,रमेश दौड,शेख कासिम, सचिन कोरडे,सुरेश काळे,व्यंकट चव्हाण राजेंद्र पवार,प्रकाश पवार,वल्लभ  राठी, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, पत्रकार शिवाजी शिंदे, लक्ष्मण बोराडे,लक्ष्मण बुरेवार,बबनगायकवाड,बालाजी सरकाळे,जनाआबा सोळंके,सुभाषचव्हाण,आप्पू सोळंके,मनोज दीक्षित संतोष बेंडे,राजू रोडगे आदींची उपस्थि ती होती.पोलिस निरीक्षक प्रभाकर कवाळे  पहिला बॉल खेळून लीगला ग्रीन सिग्नल दिला,उद्घाटन प्रसंगी फ्रेंडली मॅच आयोजित केले होते यामधे डॉक्टर असोसि एशन तसेच मेडिकल असोसिएशन व वकील संघ यांच्यात सामना खेळवण्यात आला.यावेळी डॉ. असोसिएशनचे डॉ.परेश बिनायके वकील संघाचे अध्यक्ष एड.बाळासाहेब रोडगे व मेडिकल असोसि एशनचे श्री संदीप टा...

26 जानेवारी 2025 रोजी बोरगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन. बोरगांव नगरीत एकाच दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन हे नवलच.

इमेज
बोरगाव/ प्रतिनिधी बोरगाव येथे 26 जानेवारी  2025 रोजी  प्रजासत्ताक दिना निमित्त विविध संघटनेमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .यामध्ये बोरगाव येथील एल बी  बॉयिज यांच्या वतीने भव्य अन दिव्य हाप स्पीच क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्रथम क्रमांक बक्षीस 21001, नगर सेवक शरद जंगठे यांच्या कडून, द्वितीय बक्षीस  15001, श्री दादासाहेब भादोले यांच्याकडून, तृतीय बक्षीस 10001 श्री पिंटू दुर्गमरगे, शिवाय वैयक्तिक बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही बोरगाव येथील आर के नगर मध्ये 26 जानेवारी पासून सुरू होत आहे.     बोरगावचे ग्रामदैवत श्री हजरत पीर बावां ढंग वली दर्ग्याच्या भव्य पटांगणामध्ये 26 जानेवारी 2025 रोजी रात्री आठ वाजता हिंदू मुस्लिम करबल कमिटी व जीपी स्पोर्ट्स यांच्या वतीने भव्य करबल दंगली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, यामधील प्रथम क्रमांक बक्षीस 11001, द्वितीय 9001, तृतीय 7001,चतुर्थी 5001 व पाचवं बक्षीस 3001 अशी बक्षिसे ठेवण्यात आलेले आहेत, व बाबासाहेब भिकू यांच्याकडून सर्व बक्षीस विजेत्यांना स्...

छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान तर्फे रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठाण गगगजजाजडाजडधोधौञञञञञञञ् करण्यात आलेल्या रक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबीराची सुरवात राजारामपुरी पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक मा.श्री इंगळे साहेब याच्या कडून करण्यात आली त्यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पडले तसेच अनेक रुग्णांनी आरोग्य शिबिरामध्ये आपली तपासणी करून घेतली या वेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.अर्जुन बुचडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला वेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजातील युवक व महिला मंडळ मध्ये उपस्थित होते

खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी.

इमेज
शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.    कार्यक्रमाची सुरवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमा पुजनाने व दिपप्रज्वलनाने झाली.विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. यासीन मुजावर सर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापुजन संपन्न झाले.   यानंतर विद्यालयातील इयत्ता 5वी तील विद्यार्थीनी कु.अंजली बिरंगे हिने आपल्या मनोगतातुन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची माहीती सांगितली.तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेल्या देशकार्या विषयी माहिती सांगितली.       या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक- शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.       या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. समाजे सी.बी.यांनी केले.तर आभार सौ.मगदुम एस.जी.यांनी मानले.

सोनू दरेगावकर यांच्या "जगणं दुनियादारीचं"मराठी पुस्तकाचे दुबईत प्रकाशन.

इमेज
प्रतिनिधी -सारंग महाजन. नांदेड: येथील युवा साहित्यिक सोनू दरेगावकर लिखित, "जगणं दुनियादारीचं" या मराठी पुस्तकाचे २१ जानेवारी रोजी दुबईमध्ये प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन यशदा पुणेचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून व स्वयंदीप प्रकाशन, पुणे यांच्या विद्यमाने करण्यात आले. स्वयंदीप फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने दरवर्षी डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून दुबईमध्ये लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हा कार्यक्रम दुबईमध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष दुबईमधील प्रसिद्ध उद्योजक डॉ. शेख जाशीम गेलान चेअरमन ऑईल अँड गॅस ग्रुप ऑफ गेलान यांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात "जगणं दुनियादारीचं" या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी डॉ. बबन जोगदंड, सहाय्यक पोलीस आयुक्त राजीव मोरे, उद्योजक दीपक ढोले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. जाशीम यांनी या कवितासंग्रहातील कविता या निसर्ग आणि मानव यांना जोडणाऱ्या  कविता असून मानवी उत्थानाचा विचार या पुस्तकात मांडला आहे, असे प्रतिपादन केले. या पुस्तकाबद्दल डॉ. बबन जोगदंड...

जनवाड येथील श्री गणपती मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी धर्मस्थळ कडून एक लाख रुपयाचा धनादेश.

इमेज
प्रतिनिधी - शितल कुडचे  जनवाड.ता. चिकोडी येथील श्री आनंदा ज्योतिबा मोकाशी यांनी साडेपाच गुंठे जमीन मंदिरासाठी दान दिलेल्या जागेमध्ये स्वामी विवेकानंद युवा सेवा संघ यांनी 2012 मध्ये स्थापित केलेल्या गणपती मंदिराच्या सर्वांगीण जीर्णोद्धारासाठी धर्मस्थळ ग्रामीण वृद्धी संघ कडून एक लाख रुपयाचा धनादेश विवेकानंद सेवा संघाचे अध्यक्ष माननीय श्री आनंद मोकाशी  यांच्याकडे श्री विठ्ठल सालीयान(धर्मस्थळ ग्रामांभिवृढी योजना जिल्हा संचालक) यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला .या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी सर्वप्रथम डॉक्टर रमेश चौगुले यांनी  स्वागत व प्रस्ताविक केले त्यानंतर स्वामी विवेकानंद युवा सेवा संघाकडून श्री विठ्ठल सालियान यांचा सत्कार संघाचे अध्यक्ष श्री आनंद मोकाशी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला तसेच मंजू नायक (धर्मस्थळ ग्रामभिवृद्धी निपाणी योजना अधिकारी) यांचा सत्कार युवा संघाचे सेक्रेटरी संजय रवळू केदारी यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर सिद्धांना कट्टी कर (बेडकिहाल सर्कल ...

वल्लभ लोया, चंद्रप्रकाश सांगतानी,दीपक खराबे यांची निवड.

इमेज
शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : सेलू येथील श्री संत गोविंद बाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व साधारण सभेत सोमवार दिनांक 20 जानेवारी रोजी कार्य कारिणीच्या  नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.संस्थे चे अध्यक्ष रामनाना खराबे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून श्रीबल्लभ लोया, सचिव - चंद्रप्रकाश सांगतानी , सहसचिव म्हणून दिपक शिवाजीराव खराबे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.बैठकीसाठी जेष्ठ संचालक जयप्रकाश जी  बिहाणी, प्राचार्य डॉ.ए.एम.डख,चंद्रकांत कदम, अशोक मंत्री, मुंजाभाऊ भिसे, सुनील बापू डख, चंद्रशेखर नावाडे , प्रफुल्लकुमार बिनायके, प्रल्हादराव कान्हेकर, नंदकिशोर बहिवाल, एकनाथराव पौळ यांची उपस्थिती होती.नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीरामनाना पाटील व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त पदाधिका ऱ्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहती मधील श्री गणपती टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग . आगीत सुमारे दिड कोटी रुपयांचे नुकसान.

इमेज
यड्राव (प्रतिनिधी )   यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीत असलेल्या श्री गणपती टेक्स्टाईल कंपनीला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागून सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत कच्चा माल, मशिनरी, इमारतीचे बांधकाम आणि इतर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना सोमवारी रात्री दीडच्या सुमारास घडली. कंपनीच्या मालक संगीतादेवी सुरेश माथूर यांना कर्मचाऱ्यांनी फोन करून याबाबत माहिती दिली. कंपनीला सोमवार सुट्टी असल्याने दिवसभर बंद होती. मात्र, येथे वस्तीस असणाऱ्या कर्मचारी लघुशंकेश उठल्यानंतर रात्री अचानक आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही माहिती सुरेश माथूर यांना दिली.  ही आग आटोक्यात आणण्यासाठी इचलकरंजी, कुरुंदवाड, जयसिंगपूर आणि सांगली येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. तब्बल चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. आगीत अंदाजे ७० ते ७५ लाख रुपयांचा कच्चा माल, २५ लाख रुपयांची मशिनरी आणि इमारतीचे इ...

अन्यायाविरुद्ध न्यायाचा रथ चालवा- ह.भ. प.प्रसाद महाराज काष्टे

शिवाजी शिंदे सेलू तालूका प्रतिनिधी  सेलू : दि. 21 जाने. समाजात कितीही वाईट प्रवृत्तीची लोक असली तरीही आपण आपला चांगुलपणा सोडू नये अन्याया विरुद्ध आपण सतत लढत राहिलं पाहिजे आणि आपल्या न्याया चा रथ चालवला पाहि जे. यासाठी चांगली माणसं जोडणं अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यां नी सभा धीटपणा अंगीकारावा जो प्रयत्नांनी येतो. असे प्रतिपादन ह. भ. प .प्रसाद महाराज काष्टे यांनी केले काजळी रोहिना येथे आयोजित नूतन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना समारोप समारंभात मंगळवार (दिनांक 21) रोजी केले. कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया हे होते. नूतन महाविद्या लयाचे काजळी रोहिना येथे ‘युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी’ हा विषय असलेले शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरा त प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ह भ प प्रसाद महाराज काष्टे पुढे म्हणाले की," युवकांनी सतत आपल्या ध्येयाचा ध्यास धरावा आणि ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न करावेत सातत्य आणि मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे. परीक्षेत यश मिळवण्या सोबतच एक चांगला व्यक्ती सुद्धा व्हावे असे ते म्हणाले.यावेळ...