नृरसिंह वाडी येथे सामाजिक कार्यकर्ते अनिल लोंढे यांचा सत्कार
श्री दत्त महाराज याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नृसिंहवाडी येथे शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी गेली विस ते पंचवीस वर्षे समाजाची सेवा करीत कधिच व कसलीही कोणतीही अपेक्षा न करता प्रामाणिक पणे गोरगरीबांचे प्रश्न सोडवत
चांगल्या विचारांची देवाणघेवाण करीत तहसील कार्यालया पासून पोलिस स्टेशन पंचायत समिती पर्यंत तसेच कला. क्रीडा. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील आपली भुमिका बजावणारे. अनिल लोंढे यांची राष्ट्रीय मांग गारूडी क्रांती सेना या संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव पदी नागपूर येथे निवड झाल्याबद्दल श्री क्षेत्र नृरसिंह वाडी येथे श्री अभिजीत जगदाळे (सरकार) माजी सरपंच नृसिंहवाडी.तसेच श्री ऋषीराज शिंदे सोसायटी चेअरमन कवठे गुलंद यांनी अनिल लोंढे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला त्यावेळी श्री वैभव घोरपडे सामाजिक कार्यकर्ते कुरुंदवाड. श्री किरण मुडशिंगे सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष. श्री पांडुरंग सुंकी सामाजिक कार्यकर्ते नृसिवाडी. श्री गवळी त्रिमूर्ती हॉटेलचे मालक. व इतर मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या