सफाई कामगारांना 52 लाख किमान वेतनाचा फरक देण्याचा जयसिंगपूर नगरपालिकेला व ठेकेदारला आदेश.

इचलकरंजी -  जयसिंगपूर नगरपालिकेकडे कंत्राटी काम करणाऱ्या 48 कामगारांना किमान वेतन प्रमाणे पगार दिला नाही म्हणून किमान वेतन फरकाची केस सहायक कामगार आयुक्त कार्यालय तथा सक्षम प्राधिकारी अधिकारी इचलकरंजी यांच्याकडे दाखल केली होती. या केसच्या अनुषंगाने तिन्ही बाजूंनी आपली बाजू मांडून केस चालली त्या केस चा निकाल माननीय जानकी भोईटे यांनी  सर्व कामगारांना किमान वेतनेचा फरक म्हणून 51, 87, 360/- देण्याचा आदेश केला. 
    .  जयसिंगपूर नगरपालिके मार्फत ठेकेदार यांचेकडे सफाई कामगार, कचरा उठाव करणारे कामगार व रस्ते साप करणारे कामगार असे 48 कामगारांनी कीमान वेतन प्रमाणे पगार मिळत नसलेची व सहा महीन्याच्या कीमान वेतन फरकाची तक्रार दाखल केली होती जयसिंगपुर नगरपालीका, कंत्राटदार मायक्रो इकोनॉमीकल एनव्हायमेंट सोल्युशन प्रा. ली. व कामगार प्रतिनिधी यांचे म्हणने व युक्तीवाद ऐकून घेऊन सक्षम प्राधिकारी सहाय्यक कामगार आयुक्त मा. जानकी भोईटे यांनी निकाल दिला  या निकालातून महिला कामगारास प्रत्येकी 1,21,820 तर पुरुष कामगारास प्रत्येकी 82,338/- रुपये फरक मिळणार आहे. सर्व कामगारांच्या बाजुने जनरल लेबर युनियन( आयटक ) अध्यक्ष कॉ. आनंदा गुरव यांनी भक्कम बाजु मांडून काम पाहीले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.