‘लॉयन्सच्या’ शिबीरात 380 रुग्णांची मोफत तपासणी.
शिवाजी शिंदे
69 रुग्णांची परतूर येथे अत्यल्प दरात होणार नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया.
सेलू : दि.24 येथील लॉयन्स क्लब च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र व दंतरोग तपासणी शिबीरात एकूण 380 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 69 रुग्णांची लॉयन्स नेत्रालय परतूर येथे अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. सेलूतील हुतात्मा स्मारक येथे रविववार 23 फेबु्रवारी रोजी मोफत नेत्र व दंतरोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक रामप्रसाद घोडके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लॉयन्स क्लबचे रिजनल चेअर पर्सन लॉ. दिलीप मोदी, लॉ.संजय गुप्ता, लॉ. राजेश लुनिया, लॉ. मनोहर खालापुरे, डॉ.चव्हाण तालुका ध्यक्ष सुयश पटवारी सचिव डॉ बाळासाहेब जाधव, डॉ. शैलेश मालाणी, संजीवनी खालापुरे यांची उपस्थिती होती. नेत्र तपासणीसाठी लॉयन्स नेत्रालयाचे तंत्रज्ञ अशोक पौळ,आकांक्षा केवारे, पुजा पाचारे, कवीता दुगाने तर दंत तपासणीसाठी डॉ. विजय सावंगीकर, डॉ. कुंदन राऊत, डॉ. सौ. भाबट, डॉ. परेश बिनायके, रुग्वेद लॅबचे गणेश आकात, महेश गोरे, प्रमोद हिंगे यांनी रुग्णांची तपासणी केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब जाधव, सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर दतात्रय सोळंके यांनी आभार मानले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी सह सचिव डॉ. अनुराग जोगदंड, डॉ. आशिष मेहता, डॉ. सुदर्शन मालाणी, अनुप गुप्ता, राजेंद्र सराफ, खुशाल तांगडे, कृष्णा काटे, विनोद शेरे , शंभू काकडे, जयसिंग शेळके, वैभव संघई, अजित सराफ, डॉ. उमेश गायकवाड, डॉ. कैलास आवटे, सागर लोया आदिंनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या