महाशिवरात्री निमित्त सेलू येथील साईबाबा मंदिरात महाभिषेक.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

माजी नगराध्यक्ष मा. विनोद हरिभाऊ काका बोराडे व मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम. 

सेलू : गेल्या वर्षी प्रमाणे महाशिवरात्री निमित्त सेलू येथील महेश नगरातील श्री साईबाबा मंदिरात दि. 26 फेब्रुवारी बुधवार रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मंदिरात जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. देशातील प्रमुख नद्या, बारा ज्योतिर्लिंग व तीर्थक्षेत्रातील् जलाश्याने शहरातील 301 जोडप्यांच्या हस्ते मंदिरातील श्री  महेश्वर शिवलिंगाचा महाभिषेक व महा आरती बुधवारी सकाळी 10:30 वाजता करण्यात येणार आहे. अभिषेकासाठी लागणारे साहित्य मंदिरा तर्फे देण्यात येणार आहे.सायंकाळी 7:30 वाजता स्वरांगण प्रस्तुत 'स्वरभक्ती संध्या' हा भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवलिंगाचा अभिषेक करून पुण्यार्जन करावे,व रात्री भक्तिगितांच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री साईबाबा मंदिर समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विनोद हरिभाऊ काका बोराडे, मंदिर समिती चे संचालक व मित्र मंडळानी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.