रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया ( आठवले ) पक्षाच्या सल्लागार पदी रंगराव कांबळे तर उल्हास भोसले यांची उपाध्यक्ष पदी निवड.

यड्राव ( प्रतिनिधी ) ः येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सद्स्य रंगराव गणपती कांबळे यांची शिरोळ तालुका रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले ) पक्षाच्या सल्लागार पदी  तर माजी सरपंच उल्हास विठ्ठल भोसले यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र शिरोळ तालुका रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले ) पक्षाचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते  व शिरोळ तालुका कार्याध्यक्ष मारुती मोहिते, कोल्हापूर जिल्हा संघटक गौतम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.                                               सदर निवड नाम. रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सामाजिक न्यायाचा लढा पक्षाच्या माध्यमातून यशस्वीपणे व अविरतपणे लढत आहात. या आपल्या आंबेडकरी चळवळीतील सहभागाची व आजपर्यंत नाम. रामदास आठवले यांच्यावर दृढ विश्वास ठेवून केलेल्या अन्याय आत्याचाराच्या विरोधात आंदोलनाची व पक्ष बांधणीच्या कामातील सहभागाची दखल घेऊन तसेच सर्वसामान्य जनता ते तळागाळातील जनतेपर्यंत रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले ) पक्ष बळकट व मजबूत कराल या उद्देशाने निवड करण्यात आली असल्याचे निवडपत्रात म्हटले आहे.                                                           सदर कार्यक्रम कुरुंदवाड येथील सधना मंडळाच्या सभागृहात सामाजिक कार्यकर्ते व यड्राव ग्रा. प. सद्स्य रंगराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते रंगराव कांबळे व माजी सरपंच उल्हास भोसले यांची झालेल्या निवडीबद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.