बुलढाणा येथील प्रसिद्ध कलाकार धनंजय बोरकर
राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पावनभूमीत बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा येथील प्रसिद्ध कलावंत धनंजय बोरकर हे आपला जॉब सांभाळून कलाक्षेत्रात खूप चांगलं काम करत असून उत्कृष्ट नेपथ्यकार आहे. तसेच वाय के टी एम (Y K T M) या वेब सिरीज मध्ये आपली कला सादर केली आहे.
धनंजय बोरकर यांनी अर्थातराण्यास (चंचल स्वामी), मी काहीही विसरलो नाही (डॉक्टर देशमुख ),तलाई कुत्तल (रिपोर्टर), नाटेवा नसंप्र (मित्र) अनपेक्षित अनपेक्षित या (सबनीस- लीड) या नाटकात प्रमुख भूमिका केल्या आहे. कलाक्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल राज्य नाट्य स्पर्धा (कौन्सिलेशन प्राईज), कामगार कल्याण प्राथमिक फेरी( द्वितीय क्रमांक), कामगार कल्याण अंतिम फेरी नाटक (प्रथम क्रमांक), कामगार कल्याण अंतिम फेरी (अभिनय द्वितीय क्रमांक). या पारितोषकांनी सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट कलेबद्दल व पारितोषिक मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून धनंजय बोरकर यांचे मित्रमंडळी नातेवाईक यांनी कौतुक केले आहे.
टिप्पण्या