केंद्राच्या नक्षा डिजिटल सर्वेला नागरिकांनी सहकार्य करावे. - बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचे मत.

बोरगांव/प्रतिनिधी.
           मोबाईलच्या जमान्यात बदलत्या परिस्थितीनुसार सर्व क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहे, भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे शेतीच्या  विकसित क्षेत्राला ऊर्जेता अवस्था देण्यासाठी केंद्र सरकारने देशातील शहरी व ग्रामीण भागातील गावठाण शेती व बॉर्डर एरियाचे ड्रोन द्वारा सिटीसर्वे करण्याचे कार्य हाती घेतले आहे,  बेळगाव जिल्ह्यातील नक्षा या सिटीसर्वेसाठी बोरगाव व गोकाक या दोन पट्टणपंचायतचे सिलेक्शन करण्यात आले आहे, त्या कारण बोरगाव शहरातील नागरिकांनी या मोहिमेस उत्स्फूर्त  प्रतिसाद देऊन  यशस्वी करावे असे आवाहन चिकोडी जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व बुडा अध्यक्ष श्री लक्ष्मण राव चींगळे यांनी व्यक्त केले. ते बोरगाव येथील श्री वाशीखान  मंदिरात आयोजित शासकीय कार्यक्रमात  बोलत होते.
             बोरगांव येथील वासिखान मंदिर येथे कर्नाटक सरकार महसूल विभाग, व भूमापन महसूल व्यवस्था आणि भू दाखला नगर प्राधीकार डिपार्टमेंट आणि बोरगांव पट्टन पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने  बोरगांव शहरातील घर व प्लॉट, शेती, भूखंड नकाशा तयार करणे  (सिटी सर्वे ) नक्षा या सदराखाली वाशी खान मंदिर मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 
बेळगाव बुडा अध्यक्ष श्री लक्ष्मण चिंगळे , सहकाररत्न श्री उत्तम  पाटील, माजी  जिल्हा पंचायत सदस्य श्री अण्णासाहेब हवले, डी डी एल आर ऑफिसर  शशिकांत हेगडे,ए डी एल आर ऑफिसर  विजयकुमार, बोरगांव पट्टण पंचायत अध्यक्ष पिंटू कांबळे, उपाध्यक्ष भारती वसवाडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप माळी,  पट्टणपंचायत चिएफ ऑफिसर स्वानंद तोडकर  यांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पंचायत वतीने सत्कार करण्यात आला.
      यावेळी उपस्थित शेतकरी बांधव  व नागरिकांना नक्षा या सिटी सर्व्हे बद्दलची माहिती व छायाचित्र प्रतेक्षिक दाखविण्यात आली.
   या कार्यक्रमास बुडा अध्यक्ष श्री लक्ष्मण राव इंगळे,युवा नेते उत्तम पाटील, अण्णासाहेब हवले,बसू पाटील, नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उप नगराध्यक्ष सौ भारती वसवांडे,अशोक आरगे,नगर सेवक श्री अभय मगदूम,माणिक कुंभार,प्रदीप माळी ,तुळशीदास वसवांडे,शोभा हवले,गिरिजा वठारे,संगीता शिंगे   सह नगर सेवक,मुख्याधिकारी सानंद तोडकर, आशा, अंगणवाडी कर्मचारी,पंचायत कर्मचारी,ग्रामस्थ व नक्षा डिजिटल सर्वे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.
    कार्यक्रमाचे सूतरसंचालन एस, डी तोडकर यांनी केले तर आभार पोपट कुरळे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.