शिंगणापूरातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह पंचगंगा नदीत सापडला

शिंगणापूर, ता.१७ : (ता.करवीर) येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह पंचगंगा नदीत शिंगणापूर बंधाऱ्या जवळ आढळला. सुरज शिवाजी पाटील (वय ३५) रा.हरिप्रिया कॉलनी,शिंगणापूर असे  या तरुणाचे नाव आहे या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
   पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी सुरज पाटील हा शाहूपुरी तीसरी गल्ली येथील एचडीबी या फायनान्स कंपनीमध्ये कामावर होता. शनिवार दि.१५ रोजी तो रात्री ८.३० वाजता आपल्या मोटरसायकलने घरी येण्यासाठी निघाला.कुटुंबियांना मी उशिरा घरी येणार असून तुम्ही जेवण करा असा फोनही केला होता. पण त्यानंतर सुरजचा फोन बंद लागत होता. यामुळे संपर्क होत नव्हता.सोमवारी  दुपारी शिंगणापूर येथील बंधाऱ्याजवळ नदीपात्रात सुरजचा मृतदेह ग्रामस्थांना दिसला.पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून पंचनामा करून शवविच्छेदना साठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. सुरजच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई वडील, दोन विवाहित बहिणी आहेत.

चौकट
सुरज हा आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्याबरोबर ताराबाई पार्क येथे आयोजित क्रिकेटचा सामना खेळला होता. घरी निघताना तो गंगावेश मार्गाने शिंगणापूर येथील हरिप्रीया काँलनीत यायला हवा होता. पण कोल्हापूर जोतिबा रस्त्यावर तो जात असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कँमेऱ्यात दिसत आहे. शिंगणापूर बंधाऱ्यावर का गेला होता. त्याने आत्महत्या केली की घातपात याबद्दल पोलिसांसमोर आव्हान आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.