मलिकवाडला महाशिवरात्रीनिमित्त बुधवारपासून विविध कार्यक्रम.
मलिकवाड तालुका चिकोडी येथील श्री. मल्लिकार्जुन (महादेव) मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे. बुधवारी (ता.२६) व गुरुवारी (ता.२७) या दोन दिवशी मंदिर जीर्णोद्धार कमिटी व ग्रामस्थांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवारी पहाटे पाच वाजता सामूहिक दंडवत, सात वाजता महाभिषेक, श्री महादेवाची महाआरती संपन्न होणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता भजनाचा कार्यक्रम होईल. तसेच तीन वाजता सामान्य ज्ञान स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी पाचवी ते सातवी (प्राथमिक गट), आठवी ते दहावी (माध्यमिक गट) आणि खुला गट तिन्ही विभागात गाव पातळीवर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यासाठी विजेत्यांना रोख रक्कम बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्राचे वितरण केले जाणार आहे. गुरुवारी २७ रोजी सकाळी ११ वाजता महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
टिप्पण्या